बल्लारपूर शहरातील विद्यानगर वार्डात युवकाने केली आत्महत्या…

638

बल्लारपूर- शहरातील‌ टेकडी भागात काही दिवसांपूर्वी विद्यानगर वॉर्डातील ऑटोरिक्षा चालक असलेल्या सुशांत भीमराव झाडे यांनी अवैध सावकारीच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांनाच पुन्हा विद्यानगर वार्डातील पंचशिल चौक या परीसरामध्ये राहणाऱ्या अनिल नारायण देवगडे या 20 वर्षीय यूवकाने गळफास लाऊन‌ आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळि 6:30 च्या सुमारास घडली आहे.

सदर युवकाने राहते घरीच गळफास लाऊन‌ आत्महत्या केली आहे, अनिल हा मोल मजुरी करीत होता, सध्या 3 महीन्यापासुन काम धंदा काही नसल्याने तो घरीच होता.
अनिल हा नारायण देवगडे यांचा तिसऱ्या नंबरचा मुलगा आहे. अनिल हा मेहनती आणि होतकरु मुलगा होता. त्याच्या जाण्याने देवगडे कुटुंबीयांवर दु:खाचे संकट कोसळले आहे. घटनेचा अधिक तपास बल्लारशाह पोलीस करीत आहे.