20 वर्षांनंतर आलापल्ली -एटापल्ली मार्गाचे काम सुरू त्रिवेणी कंपनीने हाती घेतले काम…

0
269
Advertisements

प्रितम गग्गुरी प्रतिनिधी

एटापल्ली :- मागील वर्षांपासून आलापल्ली-एटापल्ली मार्गाची पूर्णतः दुर्दशा झाली होती. अनेक दुर्घटना या रस्त्यावर घडल्या आहेत. यामुळे तालुक्यातील नागरिकांतून लोकप्रतिनिधी व प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान तालुक्यातील सरजागड पहाडीवर काम करणाऱ्या त्रिवेणी कंपनीने आलापल्ली-एटापल्ली या मुख्य मार्गाचे काम सुरू केले आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Advertisements

सुरजागड पहाडीवर काम करणाऱ्या लॉय मेटल कंपनीने सुरजागडचे त्रिवेणी काम अर्थमव्हर्स प्रा.लि. कंपनीकडे सोपविले आहे. दरम्यान तालुक्यातील नागरिकांच्या मागणीनसार 11 जून रोजी अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम एटापलीत पोहोचले. आत्राम यांनी आलापल्ली-एटापल्ली-चोखेवाडा रस्ता कामाचे शुभारंभ केले होते. तसेच या रस्त्याचे काम संबंधित कंपनी द्वारा सुरू करण्याची माहिती दिली होती.

त्रिवेणी कंपनीने लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कंपनीने आलापल्ली-एटापल्ली या प्रमुख मार्गाचे काम सुरु केले आहे. यामुळे मागील 20 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here