“वन्यजीव जतन करा” पोस्टर स्पर्धेचा निकाल जाहीर…चंद्रपुरचा राहुल हुलके प्रथम तर बिहारची दिपा कुमारी चौरसिया द्वितीय…

0
294

चामोर्शी : प्रतिनीधी
नेमाजी घोगरे
महाराष्ट्र शासनाच्या मध्यचांदा वनविभाग चंद्रपूर यांच्या सहकार्याने शिवाजी आर्ट्स, कॉमर्स आणि विज्ञान शाखा महाविद्यालय राजुराद्वारा “वन्यजीव जतन करा” या विषयावर ई-पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेत गोंडवाना विद्यापिठातील विद्यार्थ्यांसह देशभरातील अन्य विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या विद्यार्थ्यांनी वन्यजीव संरक्षणाचे महत्व पेास्टर्सच्या माध्यमातून प्रकट केले.नुकताच या स्पर्धेचा निकाल लागला.यामध्ये सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूरचा विद्यार्थी राहुल साईनाथ हुलके याने प्रथम क्रमांक पटकावला.तर

जय प्रकाश विद्यापीठ छप्रा बिहारची विद्यार्थीनी दिपा कुमारी चौरसिया,सुमन विद्यापीठ उत्तराखंडचा विद्यार्थी कसक नौतियाल श्रीदेव,एस. एस.जे.विद्यापिठ अलमोडा उत्तराखंडची विद्यार्थीनी हिमांशी पाठक,गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीची विद्यार्थीनी वैष्णवी हेमंत हलकारे यांनी अनुक्रमे द्वितीय,त्रितीय क्रमांक पटकावले. राहुल हुलके हा गडचिरोली जिल्ह्यातील कढोली तालुका चामोर्शी या गावचा रहिवासी आहे.त्याने आपल्या यशाचे श्रेय आईवडील,शिक्षक आणि मित्र मंडळींना दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here