जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांची गोंडपीपरी तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट …

526

गोंडपीपरी : ०३ जुलै २०२१, शनिवार

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तोहोगाव, धाबा, नवेगाव मोरे येथे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी आज आकस्मिक भेट दिली. यावेळी सध्या सुरू असलेल्या लसीकरनाबाबत चर्चा करण्यात आली.
काही प्राथमिक केंद्रामध्ये असलेली असुविधा जाणवली. धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत निर्लेखन करणे आवश्यक आहे. आतापर्यंत धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण जवळ पास पूर्ण झालेलं आहे.
आतापर्यंत झालेल्या लसीकरण बाबत चर्चा करण्यात आली. पावसाळ्यात येणाऱ्या साथीच्या रोगावर नियोजन बाबत चर्चा करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे, ऑक्सिजन सिलेंडर, बेड ची उपलब्धता, औषधी साठा, अंबुलन्स, सोयी सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तशेच कोरोना आजारावरील लसीकरण याबाबत माहिती देण्यात आली. कोरोनाची तिसरी लाट रोखण्याबाबत, जास्तीत जास्त लसीकरण करण्याबाबत, जनजागृती करण्याबाबत चे निर्देश वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले.
ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामदे आर्टिपीसिआर व अँटीजन चाचण्या होत आहेत त्या केंद्रामध्ये चाचणीची संख्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच तोहोगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा लसीकरण जवळपास पूर्ण झालेले आहे. थोडी फार पाण्याची समस्या जाणवली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून साथ रोग प्रतिबंधक उपाय योजना तयारी तशेच डेल्टा प्लस या आजरा बाबतची तयारी याबाबत सुद्धा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून माहिती घेण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र तोहोगाव येथे भेट दिली त्यावेळी श्री प्रकाश उत्तरवार सदस्य रुग्ण कल्याण समिती तोहोगाव तसेच माजी सरपंच तोहोगाव, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जवळे, डॉक्टर बेले मॅडम, सुप्रिया येडमे सी एच ओ, श्री निरंजने औषध निर्माण अधिकारी, श्री करमरकर आरोग्य सहाय्यक, सौ टेकाम सिस्टर आरोग्य सेविका, तसेच प्रवीण टेंभुर्णे, अनुराधा नारनवरे रत्नाताई कारपेनवार हे परिचर उपस्थित होते.
तसेच धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये श्री अरुण कोडापे उपसभापती, सौ. नंदा घोगरे सरपंच, सौ रोशनी अनमूलवार माजी सरपंच, श्री अमर बोडलावर माजी जी प सदस्य, स्वप्नील अनमूलवार सदस्य ग्राम पंचायत, निलेश पुलगमवर सरपंच ग्राम पंचायत हिवरा, डॉ प्रदीप लोने वैद्यकीय अधिकारी, राजेंद्द कंदिकुरवार उपसरपंच, राजेंद्र गोहणे ग्राम पंचायत सदस्य, व कार्यकर्ते उपस्थित होते.