तीन महिन्यापूर्वी केले होते लव्ह-मॅरेज! किरकोळ भांडणाच्या रागातून पतीने केला पत्नीचा खून…

0
1519

ब्युरोचीफ प्रशांत शाहा
पुणे:पुण्यातील देहूगावात एका नवविवाहित जोडप्यात झालेल्या भांडणातून खून झाल्याची घटना समोर आली आहे. अगदी किरकोळ भांडणाच्या रागातून पतीने आपल्या पत्नीचा खून केला. पूजा वैभव लाकमाने असे मयत तरुणीचे नाव आहे.
पूजा आणि वैभव यांनी तीन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता.

त्यानंतर हे दोघे देहूगावामधील साई नगरी, वडाचा मळा याठिकाणी ते राहत होते. मात्र, अवघ्या काही दिवसांत गोडीगुलाबीत सुरु असलेल्या त्यांच्या संसारात खटके उडू लागले. पूजा आणि वैभव यांच्यात काही दिवसांपूर्वीच जोरदार भांडण झाले होते. यावेळी पूजाने वैभवला आईवरुन शिवी दिली.

ही शिवी दिल्याचा राग मनात धरून पती वैभवने पत्नीचा गळा दाबून खून केला. या घटनेनंतर पोलिसांनी वैभवला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here