HomeBreaking Newsअनोळखी नंबरवरून ओळखीची मैत्रिण...एकतर्फी प्रेमाची एक अपूर्ण गोष्ट...प्रेमपत्र उघडून बघितली असती तर?

अनोळखी नंबरवरून ओळखीची मैत्रिण…एकतर्फी प्रेमाची एक अपूर्ण गोष्ट…प्रेमपत्र उघडून बघितली असती तर?

काही दिवसांपूर्वी व्हाट्सअप्प वर अनोळखी नंबरवरून ओळखीच्या एका मैत्रिणीचा मॅसेज आला होता. आधी प्रोफाइल बघितली, प्रोफाइल मधला चेहरा कुठंतरी बघितल्यासारखा वाटला. त्या चेहऱ्याकडे सतत न्याहाळत ती कोण? म्हणून बराच वेळ आठवण्याचा प्रयत्न केला पण चेहरा काही आठवत नव्हता. त्यामुळे त्या मॅसेजकडे दुर्लक्ष केले.

काल रात्री पुन्हा एक मॅसेज त्याच नंबर वरून आला. सुरज, विसरलास का? अरे मी बोलतेय…

तिने नाव सांगितले आणि आमचे बोलणे सुरू झाले. काल पूर्ण रात्रभर तिच्याशी बोलत होतो. खरं सांगायचं म्हणजे काल बोलल्यानंतर माहिती झाले की, ती माझ्यावर एकतर्फी प्रेम करायची..असो संभाषणांचा काही भाग इथे शेयर करतो…तीच नाव? ती काय करते? याचा विचार न करता संभाषण वाचावे… तुमच्याकडे वेळ असेल तर…जबरदस्ती अजिबात नाही…

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

ती: हॅलो

मी: बोला मॅडम!

ती: विसरलास गड्या तू लवकरच

मी: तसही शाळेत असतांना फार काही मुलींची आठवण काढत नव्हतोच ना?

ती: हो हो! माहिती आहे.

मी: छान आहे..

ती: बर! ती आपल्या वर्गातील किरण आठवते का?

मी: कोण ती तुझ्यासोबत राहायची ती का?

ती: हो तीच किरण!

मी: तीला कसं विसरणार? तिच्यामुळे तर मला शाळेत सुद्धा यायची भीती वाटायची…

ती: का बर! तिने काय तुझं बिघडवले?

मी: तुला काय सांगू बाई, तीच्यामुळे माझे कुठेच लक्ष लागत नव्हते. नाही अभ्यासात, नाही कोणत्या कामात, नाही घरी.. बर झालं ती नापास झाली. पहिल्याच वर्षी…

ती: अरे पण तीने केलं तरी काय?

मी: तुला सांगू का? अग तिने माझ्या घरी दोन-चार दिवसाआड सतत प्रेमपत्र पाठवायची…कधी पुस्तकात टाकून, कधी बुकामध्ये तर कधी आमच्या घराजवळच्या दादू कडे…त्रासून गेलो होतो तिच्यामुळे…

ती: (हसायला लागली) अरे वेड्या! आता मी सांगू का? नेमकं काय आहे तर?

मी: अग असुदे! नको सांगू मला तिच्याबद्दल, तसही तीच नाव घेतलं की, माझा पारा चढतोय…

ती: अरे या प्रेमपत्रामागील खरी गंमत सांगते म्हटलं तुला..

मी: (उत्सुकतेने) गंमत! कोणती गंमत ग?

ती: अरे मूर्खां…तुला मिळालेले प्रेमपत्र कधी वाचून बघितले का?

मी: नाही, का बरं? आणि तसही अश्या भानगडीत मला पडायचे नव्हतेच, त्यामुळे ते प्रेमपत्र वाचण्याचा प्रश्नच येत नव्हता…पण असो, सांग काय गंम्मत आहे?

ती: बघ, खरी गंमत सांगितल्यानंतर तू माझ्यावर रागावणार नाही ना?

मी: नाही! नाही रागावणार, आता सांग लवकर..

ती: पण तू खरंच एकही प्रेमपत्र उघडून बघितले नाही का?

मी: अरे, नाही म्हटलं ना..सांगितलं ना! नाही बघितलं म्हणून (थोडं रागावून)

ती: जा जा! नाही सांगत…मला माहिती आहे, तू नुसता चिडचिड करतोस…आताही आधीची सवय गेली नाही वाटते तुझी. चल बाय उद्या बोलूया…

मी: अरे थांब ना! सॉरी…आता शांतपणे ऐकणार बाबा तुझं, सांग प्लिज

ती: बर! आता चूप राहायचं, थोडं तरी बोललास ना तर बघ मग?

मी: हो बाबा, सांग आता लवकर, उत्सुकता वाढली आहे माझी…

ती: अरे ते प्रेमपत्र किरण पाठवत नव्हती..

मी: काय?

ती: का तुला वाचता येत नाही का? प्रेमपत्र पाठविणारी ती किरण नव्हतीच, असं म्हटलं मी…

मी: मग, ती होती तरी कोण?

ती: प्रेमपत्र उघडून बघितला असतास तर कळलं असते ना…अरे गाढवा, प्रेमपत्र पाठविणारी किरण नव्हती तर ती मी होती…

मी: आता हे काय? तू कशी असणार बरं? माझ्याकडे तर किरण बघायची, माझ्या मागे मागे राहायची…

ती: म्हणून आधीच म्हटलं ना, प्रेमपत्र उघडून बघायला हवे होते…

मी: पण तुला मी आवडायचो? काहीही…

ती: हो, तू आवडायचा रे! पण तुझं त्यावेळी माझ्याकडे लक्षच नव्हतं ना, खुप वाट बघितली रे माझा होशील म्हणून…पण एकतर्फी प्रेमात समोरच्याकडून प्रेम मिळतं नसतेच… बरोबर ना! साहित्यिक साहेब….

मी: हो बरोबर आहे तुझे, पण समोर येऊन बोलायला काय झालं?

ती: जाउदे! झालं ते झालं…गेलेल्या गोष्टी आता आठवून काय फायदा?

मी: बरोबर! अगं एक विचारू?

ती: हो, विचार ना..

मी: तुला माझा नंबर कुठून मिळाला?

ती: गेल्या दोन वर्षांपासून तुझ्या कविता, लेख मी फेसबुकवर वाचत आहे. मोठा माणूस झालास रे गड्या…

मी: मोठा वगैरे काही नाही बाबा, चांगली माणसे मिळत गेली आणि मी हळूहळू घडत चाललोय…पण नंबर?

ती: अरे सुरुवातीला कविता/लेखाच्या खाली तू नंबर देत होता. तेव्हाच नंबर सेव्ह करून ठेवलाय मी…

मी: बरं..बरं!

ती: बरं नुकतंच आता काय लिहले आहेस?

मी: पहिल्यांदाच काल्पनिक दोन पात्र घेऊन एक कथा लिहली आणि ती कथा माझ्या मित्र-मैत्रिणीकडे नुकतीच शेयर केली आहे.

ती: पण ही कथा लोक वाचतील का?

मी: का नाही? अनेकजण अगदी मन लावून वाचतात..

ती: कोण आहेत अशी माणसे?

मी: जी आता वाचत आहेत तीच…

*-सुरज पि. दहागावकर.*
*चंद्रपुर.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!