कढोली बु. ग्रामपंचायत मध्ये सरपंचाचा मनमानी कारभार…

0
801

कढोली बु. ग्रामपंचायत येथे मासिक सभेमध्ये इतर कोणत्याही सदस्यांच्या प्रश्नाला वाव न देता सरपंच फक्त स्वतःच्याच मर्जिने हिताने मनमानी करण्याच्या कारभार पाहावयास मिळत आहे. मासिक सभा म्हटले तर एक प्रकारच्या प्रस्ताव व महिन्या भरातील झालेल्या कामकाजाची हिशोब पाहणे व त्यावर प्रस्ताव पारित करून सर्व सदस्यांच्या बहुमताने प्रारित करणे म्हणजे च ठराव पास करणे असा होत असून सुद्धा . कढोली बु. ग्रामपंचायत मध्ये फक्त सरपंच स्वतःचं निर्णय घेतात असे निदर्शनास येत असल्याचे स्पष्टीकरण ग्रामपंचायत सदस्य शैलेश चटके यांनी दाखवून दिले. ग्रामपंचायत सदस्य शैलेश चटके यांनी मासिक सभे मध्ये गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली बु. मधील कर्मचारी संबंधी प्रश्न उपस्थित केला असता सरपंच यांनी तो विषय मासिक सभेमध्ये घेता येत नाही असे सांगून टाळा टाळ करण्याच्या प्रयत्न केला . त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली बु. आणि सरपंच यांच्या मध्ये कुठे तरी पाणी मुरविले जाते असे दिसून येत आहे. तरी संबंधित कारभारा वर आळा बसावा म्हणून ग्रामपंचायत सदस्य शैलेश चटके याच्या गाववासीयांच्या मदतीने पुढाकार घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here