“मुलांची काळजी आणि संरक्षण: नागरिकांची भूमिका” या विषयावर राष्ट्रीय वेबिनार…

0
196

-सुरज पि. दहागावकर (उपसंपादक)
नागपूर: ‘मुलं म्हणजे देवा घरची फुलं’ असे आपल्या समाजामध्ये म्हटल्या जाते. परंतु ही सोन्यासारखी फुलं आज उमलण्या ऐवजी कोमजून जात आहेत. म्हणून अशा मुलांची काळजी आणि त्याचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

यासाठी तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय, नागपूर तर्फे मंगळवार, दि.३० मार्च २०२१ ला मुलांची काळजी आणि संरक्षण: नागरिकांची भूमिका या विषयावर राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर वेबिनार हा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.स्वाती धर्माधिकारी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली होत असून या वेबिनारला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऍड. संजय सेंगर सर (जे.जे.बी. मेम्बर अकोला) उपस्थित राहणार आहेत. सोबतच तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाचे समस्त प्राध्यापक वृंद उपस्थित असतील.

या कार्यक्रमाला संयोजक म्हणून डॉ.शिल्पा पुराणीक मॅडम असून या वेबिनारला जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वर्णिमा कमलवार, दिपांकर भोजने, तुषार हुकरे, वृषाली केकरे, श्रुतिका अंजणकर, सुरज दहागावकर, रोहिणी पवार, मुकुल पराते यांनी केले आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here