Homeचंद्रपूरपोंभुर्णावन्यजीव संरक्षणासाठी फिनिक्स बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी पोंभुर्णा यांना निवेदन...

वन्यजीव संरक्षणासाठी फिनिक्स बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी पोंभुर्णा यांना निवेदन…

पोंभुर्णा: महाराष्ट्र राज्यात जवळपास दहा हजार सर्पमित्र दिवसरात्र वन्यजीवांच्या रक्षणासाठी धडपडत असतात. पण पहायला गेले तर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार कोणताही वन्यजीव पकडणे किंवा बंदिस्त करणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण मनुष्यः वस्तित येणाऱ्या सापांचे लोकांपासून संरक्षण व्हावे व लोकांचे सापांपासून संरक्षण व्हावे यासाठी वनविभागाकडे कोणतीही उपाययोजना नाही किंवा तशे मनुष्यबळ नाही.
त्यामुळे निसर्गातील महत्वाचा अत्यंत उपयोगी असलेल्या सापांच्या रक्षणासाठी सर्पमित्रांना कायद्याबाहेर जावून काम करावे लागत आहे. तसेच कोणतीही योग्य माहिती नसताना काही लोकांकडून चुकीच्या पध्दतीने साप पकडले जात आहेत. त्यामुळे अनेक सापांचे व लोकांचेही जिव गेले आहेत.
दिवस भरात महाराष्ट्रात किती साप पकडले, कोणी पकडले, कुठे पकडले. ते व्यवस्थित जंगलात सोडलेत कि नाहित याची कोणतीही नोंद वनविभागाच्या कार्यालयात नाही. यामुळे साप जास्त दिवस बंदिस्त करून ठेवणे, दुर्मिळ सापांची देवान घेवान करणे, सापांचे खेळ करणे व तस्करी यासारख्या घटना वाढत आहेत. तसेच सर्पमित्र असल्याचे सांगून लोकांकडून साप पकडण्याच्या नावाखाली गरजेपेक्षा जास्त पैशांची उकळण होत आहे.
हे सर्व थांबावे यासाठी उपयोजना करण्यात याव्यात तसेच महाराष्ट्र राज्यात कायद्या अंतर्गत व शिस्तबदद पणे वन्यजीव रक्षणाचे कार्य चालावे यासाठी उपययोजना याव्यात यासाठी आज फिनिक्स बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी पोंभुर्णा यांना निवेदन देण्यात आले…
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत शेंडे, सदस्य प्रदीप कोडापे, रूपचंद गुरनुले व इतर पदाधिकारी उपस्थित होते..

सर्पमित्राच्या मागण्या खालीलप्रमाणे…
1) महाराष्ट्रातील सर्व सर्पमित्रांचा साप व त्यांना पकडण्याचा अनुभव याची
तपासणी करून रितसर वनविभाग कार्यालयात नोंद करण्यात यावी.

2) एखाद्या घरात साप आल्यास लोकांकडून पहिल्यांदा जवळच्या वनविभागाच्या कार्यालयात सपर्क व्हावा यासाठी वनविभागाच्या प्रत्येक बिट ने त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये कार्यालयाचा संपर्क क्रमांक पसरवावा.

3) फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव, नंबर व पत्ता वनविभाग कार्यालयात नोंद करण्यात यावा व नंतर त्या विभागातील सर्पमित्राला पाचारण करण्यात यावे.

4) फोन करणाऱ्या व्यक्तीला वनविभाग कार्यालयातून दोन तासांनी परत संपर्क करून “साप पकडला की नाही” व “आमची सेवा व्यवस्थित मिळाली का” याची विचारपूस करण्यात यावी.

5) दिवसभरात पकडलेले साप एका ठरावीक वेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखी खाली रोजच्या रोज सोडण्यात यावेत.

6) वनविभाग कार्यालयातून सांगितल्या शिवाय व नोंदकृत सर्पमित्रांच्या व्यतिरिक्त
कोणी साप पकडत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी.

7) सर्व नोंदणीकृत सर्पमित्रांना योग्य तो युनिफॉर्म, ओळखपत्र व सेफ्टीकिट वाटप करण्यात यावे.

8) सेवा देताना एखाद्या सर्पमित्राचा अपघात झाला किंवा जिव दगावला तर त्याच्या नातेवाईकांना शासनाकडून योग्य ती मदत मिळावी.

9) सर्पमित्रांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबीर घेण्यात यावे

10) सेवा देताना होणारा खर्च लक्षात घेता सर्पमित्रांसाठी मानधनाची तरतूद
करण्यात यावी किंवा शहराच्या आकारमाणानूसार सगळीकडे सारखाच चार्ज नियमन देण्यात यावा. यासाठी पावती पुस्तक देण्यात यावे.

वरील सर्व मागण्यांचा योग्य तो विचार व्हावा..

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!