HomeBreaking Newsकोरोना ब्रेकिंग! चंद्रपुर जिल्ह्यात गत 24 तासात 62 कोरोनामुक्त 126 पॉझिटिव्ह...

कोरोना ब्रेकिंग! चंद्रपुर जिल्ह्यात गत 24 तासात 62 कोरोनामुक्त 126 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू…

चंद्रपूर, दि. 20 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 62 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 126 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 25 हजार 518 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 972 झाली आहे. सध्या 1138 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 47 हजार 204 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 17 हजार 259 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहराच्या सिस्टर कॉलनी येथील 60 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 408 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 369, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 126 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 65, चंद्रपूर तालुका 16, बल्लारपूर चार, भद्रावती आठ, ब्रम्हपुरी सात, सिंदेवाही आठ, राजुरा दोन, चिमूर एक, वरोरा 10, कोरपना एक, जिवती दोन व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!