भयानक: मुलाने मारलेल्या थापडित आईचा मृत्यू…

0
926

स्वामी तिन्ही जगाचा… आईविना भिकारी…’ असे कवी यशवंतांनी कितीही काव्यात्म भाषेत लिहिले असले, तरी प्रत्येक वेळेस तसाच अनुभव येईल असे नसते. आजच्या बदलत्या काळात ‘शामची आई’ आणि तिचा शामही समाजातून हद्दपार होत असताना, संस्कृतीचे अवमूल्यन समाजाला कोठे घेऊन जाणार आहे, असा प्रश्‍न पडल्यावाचून राहणार नाही.

कोणाही सुसंस्कृत, सुसंस्कारीत मुलगा आपल्या जन्मदात्रीवर हात उचलणार नाही; तसे त्याचे धाडसही होणार नाही. मात्र, दिल्लीच्या ‘द्वारका’मध्ये एका कुपुत्राने आपल्या आईवर हात उचलला आणि त्याने मारलेल्या जोरदार थपडेने त्या 76 वर्षीय माऊलीचे निधन झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.

अवतार कौर नामल द्वारकामधील एका महिलेचा शेजारी रहात असलेल्या एका कुटुंबाबरोबर पार्किंगच्या प्रश्‍नावरुन वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी त्या शेजाऱ्याने पोलिसांना पाचारण केले होते. मात्र, पोलिस घटनास्थळी आल्यानंतर मात्र सदर शेजाऱ्याने कौर यांच्याविरुद्ध तक्रार करणार नसल्याचे सांगत, आमचा वाद आम्ही सोडवू असे सांगत पोलिसांना परत पाठवले होते.

पार्किंगसारख्या क्षुल्लक वादाचे रुपांतर पोलिसांना बोलावण्यापर्यंत गेल्याने, अवतार कौर यांचा बेरोजगार असलेला मुलगा रणबीर व्यथित झाला. त्याचा आधीच त्याच्या पत्नीसमवेत घरातच काही वाद झाला होता. पाठोपाठ आपली आई अवतार कौर ही किरकोळ कारणावरुन शेजाऱ्याशी भांडत असल्याचे रणबीरने पाहिले. अशातच पोलिसांपर्यंत प्रकरण गेल्याने रागाच्या भरात रणबीरने ‘तू शेजाऱ्यांशी सतत का भांडत असतेस?’ असे विचारत आईला जोरदार थप्पड लगावली. मुलाकडून अचानक झालेल्या या हल्ल्याने अवतार कौर गांगरुन गेल्या आणि बेशुद्ध होत धाडदिशी जमीनीवर कोसळल्या.

अवतार कौर यांना तातडीने रुग्णालयात नेले असताना तेथील डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केल्याने या घटनेला गंभीर वळण मिळाले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी अवतार कौर यांच्या रणबीर नामक 45 वर्षांच्या मुलाविरूद्ध बिंदापूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 304 नुसार सदोष मनुष्यवधाचा (कल्पेबल होमिसाईड) गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here