बल्लारपूरात वाढदिवस पडला महागात; बारा वर्षीय मुलीचा नदीत पाय घसरल्याने मृत्यु…

0
1004

विक्की दुपारे (प्रतिनिधी)
बल्लारपूर: शहरातील गणपती विसर्जन घाट एक पर्यटन स्थळ बनले असून या ठिकाणी दिवसभर नागरिकांची रेलचेल असते. मात्र काल याच ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली. काल दुपारी 3:00 वाजताच्या सुमारास तीन मैत्रिणी वाढदिवस साजरा करण्यासाठी वर्धा नदीच्या गणपती घाटावर गेले.

संजना धुर्वे हिचा वाढदिवस साजरा करून केक खाल्यावर आपले हात धुण्याकरिता नदी किनारी गेले असता एका 12 वर्षीय मुलीचा पाय घसरून पाण्यात बुडाली असल्याचे वृत्त आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार संजना गजानन धुर्वे वय – 21 वर्ष रा साईबाबा वॉर्ड, रविना आत्राम (20) श्रीराम वॉर्ड, अक्षरा बबन सोनटक्के (12 ) वर्ष या तिघी जणी वाढदिवस साजरा करण्याकरिता नदी घाटावर गेले. केक कापून तो केक खाऊन हात धुण्यासाठी नदी किनारी गेले असता पाय घसरून अक्षरा बबन सोनटक्के ही 12 वर्षीय रा. साईबाबा वॉर्ड बल्लारपूर हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अक्षरा ही बालाजी हायस्कुल बामणी येथे 7 व्या वर्गात शिकणारी हुशार व होतकरू मुलगी होती. ही माहिती पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले व शोधमोहीम सुरू केली. सदर वृत्त कळताच या वर्धा नदी किनारी असलेल्या किल्ला नगर वॉर्ड वासीयांनी लगेच धाव घेतल्याचे वृत्त होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here