HomeBreaking Newsप्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे थेट प्रधानमंत्र्यांच्या ट्विटरवर साकडे; निधी पाठवा...

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे थेट प्रधानमंत्र्यांच्या ट्विटरवर साकडे; निधी पाठवा…

Advertisements

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )

Advertisements

गोंडपीपरी: प्रधानमंत्री आवास योजनेच्या गोंडपिपरी येथील लाभार्थ्याने थेट प्रधानमंत्री मोदी यांच्या ट्विटरवर धाव घेऊन ,आपली व्यथा कथन करून आवास योजनेचा निधी पाठविण्याची कळकळीची विनंती केली आहे .पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याही ट्विटरवर त्याने आपली व्यथा मांडली आहे .
गोंडपिपरी येथील प्रभाग क्रमांक 9 मधील रहिवाशी अतुल चिलनकर या युवकाला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले .सदर योजनेंतर्गत राज्य सरकारकडून 1लाख तर केंद्र सरकारकडून दीड लाख रु लाभार्थ्याला दिले जातात .
अतुल ला नगरपंचायतकडून (राज्य सरकार )पहिला हफ्ता म्हणून 40000रु मिळाले .त्याने स्लॅब लेव्हलपर्यंत घरकुलाचे काम केले .स्लॅब टाकण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत .त्याने नगर पंचायत प्रशासनाकडे निधीची मागणी केली असता ,’केंद्र सरकार कडून अद्याप निधी आलेला नाही त्यामुळे निधी मिळू शकत नाही. राज्य सरकार चा निधी काही दिवसात उपलब्ध केला जाईल ‘असे कळवण्यात आले ..!

नंतर स्लॅबसाठी पैसे नसल्याने हवालदिल झालेल्या अतुलने आपली व्यथा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकौंट वर पोस्ट केली .त्यात त्यांनी आपली अडचण मांडून प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी लवकरात लवकर पाठवण्याची कळकळीची विनंती केली .
अशाच प्रकारे अतुलने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या ट्विटरवर ही आपली व्यथा मांडली आहे .त्याच्या व्यथेची कार्यालयाने दखल घेतली असून ‘आपली अडचण सविस्तर कळवा ‘ असे त्याला सांगण्यात आले .

Advertisements
Advertisements
India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!