वैनगंगा नदी पुलावरून दारू तस्करी करणाऱ्या आरोपीस आष्टी पोलिसांनी केली अटक; कुणघाडा (माल) येथील घटना…

0
370

प्रतिनिधी बंटी गेडाम

वैनगंगा नदी पात्रातून अवैध दारू तस्करी होत आहे असे कळविण्यात आले त्यानुसार आष्टी पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनात सपोनी धर्मेंद्र मडावी , सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय गोंगले,पोशी ढेंगळे, चौधरी व दोन पंचासमक्ष कुनघाडा (माल) नदीपात्र गाठले असता एक इसम नदीपात्रातील रस्त्यावरुन एक प्लास्टीक ची पिशवी घेऊन येत होता. त्याला कवेत घेऊन त्याची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातील पिशवी मध्ये विदेशी दारू IB कंपनीच्या तिस 180 मीली च्या निपा व आफिसर चॉईस च्या 95 निपा किंमत अठरा हजार पाचशे रुपये एवढा माल मिळून आला.
सदर अवैध विदेशी दारू अवैध विक्री करण्यास तस्करी करीत आहे असे दिसून आल्याने आरोपी गणेश मुतेवार वय 30 रा.कुनघाडा (माल) यांचे विरुद्ध आष्टी पोलीस स्टेशन येथे मुदाका ६५(ड) प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय गोंगले व कर्मचारी करीत आहेत.
या घटनेमुळे अवैध दारू तस्करी करणाऱ्या आरोपीस मोठा धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here