आष्टी-गोंडपिपरी मार्गावर हायवा-पिकअपची समोरासमोर धडक, एक गंभीर जखमी…

845

गोंडपिपरी : आष्टी-गोंडपीपरी मार्गातील नवेगाव (वाघाडे) जवळ हायवा आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली.यात हायवा चालक गंभीर झाला आहे.ही घटना आज ( शनिवारला ) 11 वाजताच्या दरम्यान घडली.

राजूरा येथून विठ्ठलवाड्याकडे निघालेल्या हायवाने ( क्रमांक mh 34 B G 0998 ) पीकअपला ( M H 40 CD 0029 ) समोरासमोर धडक दिली. यात हायवा चालक जखमी झाला आहे. जखमीला ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे हलविण्यात आले. पुढील तपास गोंडपीपरी पोलीस करीत आहेत.