प्राथमिक शिक्षकांच्या पंच म्हणून नेमणूका नको -जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे

0
290

अहमदनगर प्रतिनिधी :
कु.किरण जाधव

आज दिनांक 26 फेब्रुवारी 2021 रोजी माननीय गटविकास अधिकारी श्री समर्थ शेवाळे साहेब यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद व रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळ राहाता शाखेचे वतीने प्राथमिक शिक्षकांना गुन्ह्याच्या तपासात पंच म्हणून नेमणुका नको अशी प्रमुख मागणी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी केली. सदर निवेदन देताना महाराष्ट्र शासनाने दिनांक 19 मे 2016 रोजी प्राथमिक शिक्षकाना पंच म्हणून आदेश नको या आदेशाची प्रत अधिकाऱ्यांना देण्यात आली,सदर निवेदन स्वीकारले नंतर माननिय गटविकास अधिकारी म्हणाले की शासन आदेशाप्रमाणे कार्यवाही करू व तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवूअसे ठोस आश्वासन दिले यावेळी राहाता पंचायत समितीचे उपसभापती ओमेश जपे पा, संघटनेचे नाशिक विभागीय सह कार्यवाह राजेंद्र थोरात,जिल्हासरचिटनिस दत्ताजी गमे, जिल्हा कार्यालयीन चिटणीस गणेश वाघ जिल्हा उपद्यक्ष संजय वाघमारे, तालुकाध्यक्ष दत्ता गायकवाड, गुरुमाऊली अद्यक्ष सुधाकर अंत्रे,उच्चाधिकार अद्यक्ष चंद्रकांत महाडुळे,मंडळाचे कार्याद्याक्ष विनोद तोरणे ,संघटनेचे कोषाध्यक्ष उमेश वाबळे उपस्थित होते,
यावेळी सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी तर आभार सुधाकर अंत्रे यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here