सिंदेवाही: सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथून लग्न आटोपून एकारा येथे परत जात असलेल्या वरातीच्या ट्रकचा अपघात झाला. सिंदेवाही-मेंडकी मार्गावरील कचेपार येथे अपघात झाल्याने या अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या ट्रक मध्ये एकूण 50 वर्हाडी बसले होते, त्यात 20 गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. मृतकामध्ये साहिल कोराम(१४), रगुनाथ कोराम(४१), संगीता बोरकर(३५), विना गहाने (२६), वैभव सहारे (३०) यांचा समावेश आहे.