HomeBreaking Newsमोदींनी संसदेत सांगितला "NARENDRA MODI" नावाचा फुलफार्म...

मोदींनी संसदेत सांगितला “NARENDRA MODI” नावाचा फुलफार्म…

अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेदरम्यान भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते सुशील मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा फुलफॉर्म सांगितला. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात नरेंद्र मोदींच्या नावाच्या फुलफॉर्मसह अनेक आकडेवारीही मांडली.

खासदार सुशील मोदी यांनी पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्या नावातील प्रत्येक अक्षराचा फुलफॉर्म सांगितला. ते म्हणाले,

N म्हणजे New india
A म्हणजे Aatm nirbhar bharat
R म्हणजे Ready for reforms
E म्हणजे Electronic agri market
N म्हणजे New Financial Structure
D म्हणजे Disinvestment
R म्हणजे Railway and roads
A म्हणजे Agriculture Reforms

असा त्यांच्या नावाचा अर्ध आहे, तर त्यांच्या आडनावाचा

M म्हणजे MSP assured, Helping migrant worker
O म्हणजे One person company
D म्हणजे Down to earth
I म्हणजे Inclusive development

असा अर्थ होतो, असे सुशील मोदी म्हणाले.

सुशील मोदी यांनी प्रत्येक अक्षराचा अर्थ सांगितला तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी बाकडे वाजवून त्यांना साथ दिली. हिंदी आणि इंग्रजीमध्ये केलेल्या भाषणात सुशील मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. कोरोना महामारी काळात पंतप्रधानांनी दाखवलेल्या समजसूचकतेवरही सुशील मोदी यांनी दिलखुलास प्रतिक्रिया दिली. महामारीनंतर देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सावरू शकते, मात्र गेलेले जीव परत आणले जाणार नाही, असे मोदी म्हणाले होते. याचा उल्लेख करत सुशील मोदी यांनी महाभारतातील शांतिपर्वातील संस्कृत श्लोकही ऐकवला आणि याचे सरकारने पालन केल्याचेही ते म्हणाले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!