ब्रेकिंग न्यूज! ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य क्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ…

0
326

चंद्रपूर: जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य क्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली. मोहुर्ली गावाशेजारी असणाऱ्या मुधोली जंगलांतर्गत शेतशिवारात हा मृतदेह आढळून आला असून, परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अडीच ते तीन वर्षे वयाचा नर वाघ असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय, वाघाच्या अंगावर मोठ्या जखमा झालेल्या आढळल्या असून, वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही. वाघाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, शवविच्छेदनानंतरच वाघाचा मृत्यू नेमका कसा झाला याचं कारण समजणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून वाघांच्या मृत्यूच्या घटना वाढत आहेत. वाघांचा मृत्यू नेमका कशामुळे होते याचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. बऱ्याचदा शिकारीसाठी लावलेल्या फासात अडकूनही वाघांचा मृत्यू झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. आता चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बाह्य क्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळला आहे. मोहुर्ली गावाशेजारी असणाऱ्या मुधोली जंगलाअंतर्गत शेतशिवारात वाघ मृतावस्थेत सापडला असून, गावकऱ्यांनी लागलीच याची माहिती वनविभागाला दिली आहे.

साधारणतः अडीच ते तीन वर्षे वयाचा हा नर वाघ असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. वाघाच्या अंगावर मोठ्या जखमा आढळल्यानं वाघाचा मृत्यू नेमका कसा झाला याचा शोध घेतला जात आहे. दुसऱ्या वाघासोबतच्या झटापटीत तर हा वाघ मृत्युमुखी पडलेला नाही ना, याचाही वनविभागाची अधिकारी तपास करत आहेत. विशेष म्हणजे वाघाचे सर्व अवयव शाबूत आहेत. शेतशिवारात वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती मिळताच वन पथक घटनास्थळी दाखल झाले असून, वाघाच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यास सुरुवात केलीय. वाघाच्या मृत्यूचे कारण आता पोस्टमॉर्टम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. एखाद्या दुसऱ्या वाघाशी झालेल्या झुंजीत हा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here