धक्कादायक! कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार…

0
769

पनवेल: खारघरमध्ये राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीला तिच्या ओळखीतल्या दोघा तरुणांनी कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यातील एका तरुणाला खारघर पोलिसांनी अटक केली. तर फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

या घटनेतील तरुणी व तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार करणारे आरोपी हे सर्व खारघरमध्ये एकाच भागात राहाणारे असून ते पीडित तरुणीच्या ओळखीतले आहेत. 3 फेब्रुवारी रोजी रात्री पीडित तरुणी राहात असलेल्या भागात हळदीचा कार्यक्रम असल्याने पीडित तरुणी आई-वडिलांसह हळदीच्या कार्यक्रमासाठी गेली होती.

यावेळी पीडित तरुणीला तहान लागल्याने ती पाणी पिण्यासाठी गेली असताना, यातील आरोपींनी तिला जवळच असलेल्या बसमध्ये नेऊन कोल्ड्रिंक्समध्ये दारू मिसळून तिला पिण्यासाठी दिले. त्यामुळे पीडित तरुणी बेधुंद झाल्यानंतर त्यांनी बसमध्येच तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. त्यांनतर तिला अंधारात तळोजा भागात निर्जनस्थळी नेऊन सोडले.

तरुणी अचानक कुठे गेली याचा शोधशोध घेण्यात आला. त्यांनतरही ही तरुणी तळोजा परिसरात आढळून आली. आई-वडिलांनी जेव्हा तिच्याकडे विचारपुस केली असता त्यांना धक्काच बसला. त्यानंतर तातडीने त्यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. पीडितेचा जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी नराधम तरुणाला अटक केली. तर एक जण फरार झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here