HomeBreaking Newsमहसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रेती तस्करी होत असल्याचा आरोप; शेतकरी संघटनेची महसूल मंत्र्याकडे...

महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रेती तस्करी होत असल्याचा आरोप; शेतकरी संघटनेची महसूल मंत्र्याकडे तक्रार

गोंडपिपरी(सुनील डी डोंगरे ) कार्यकारी संपादक

गोंडपिपरी तालुक्यातील बऱ्याच रेतीघाटावरून स्थानिक महसूल अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने रेतीचे उत्खनन आणि तस्करी होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे . यासंदर्भात संबंधितांवर कारवाई करून रेटीतस्करीला आळा घालावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
शेतकरी संघटनेच्या वतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना तहसीलदार यांच्या मार्फतीने धाडलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,
गोंडपिपरी येथील येन बोथला ,तारडा ,तारसा ,कुलथा ,फुरडी हेटी आदी रेतीघाटावरून मोठया प्रमाणावर रेती उत्खनन आणि रेती तस्करी चालली आहे .
रात्रीच्या समयी लोक झोपलेले असताना रेती तस्करी होत असते .राजुरा ,गोंडपिपरी येथील रेतीतस्कर यात आघाडीवर आहेत .महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रेती तस्करी सुरु असल्याचा आरोप सदर निवेदनातून करन्यात आला आहे .
येत्या आठ दिवसात संबंधित अधिकारी आणि रेती तस्करांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलनात्मक पाऊले उचलण्यात येतील असा गर्भित इशारा शेतकरी संघटनेच्या या निवेदनातून देण्यात आला आहे .
शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तुकेश वानोडे ,शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष ऍड प्रफुल्ल आस्वले ,स्वतंत्र भारत पक्षाचे तालुका अध्यक्ष व्यंकटेश मल्लेलवार ,आदी कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांच्या मार्फतीने महसूल मंत्र्यांना निवेदन पाठवले .

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!