प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने गोंडपिपरी सफाई कामगारांचे उपोषण…

577

नागेश इटेकर
गोंडपीपरी, तालुका प्रतिनिधी

गोंडपिपरी नगर पंचायत अंतर्गत काम करणारे कंत्राटी सफाई कामगारांचे प्रश्न मार्गी न लागल्याने जय भवानी कामगार संघटनेच्या माध्यमातून तीन फेब्रुवारीला नगर पंचायत विरोधात उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंत्राटी सफाई व घंटागाडी कामगारांना रुजु झाल्यापासून तर चालु कार्यकाळ पर्यंतचा न भरलेला ईएसआयसी भरून सर्व कामगारांना ईएसआयसी कार्ड द्यावे, याच कालावधीतील पीएफ द्यावा, कामगारांना दोन जोडी गणवेश, गमबूट तसेच रेनकोट, निवारा शेडची व्यवस्था करावी, १ मे कामगार दिन आणि २९ एप्रिल लोकसभा निवडणूक मतदान दिवस या हक्काच्या दिवशी काम केलेल्या दिवसाचा पगार मिळावा, प्रत्येक महिन्याला वेतनासोबत वेतनचिठ्ठी मिळावी, दर महिन्याचा पगार नियोजित तारखेलाच मिळावा, तोंडी आदेश देऊन कामावर काढून टाकण्याचे प्रकार थांबवावेत, सुपर – वाईझर च्या मनमानी कारभारावर आळा बसवून कामगारांची होणारी पिळवणूक थांबवावी इत्यादी मागण्यांसाठी जय भवानी कामगार संघटनेच्या पाठिंब्याने येत्या तिन तारखेला येथील कंत्राटी सफाई कामगार नगर प्रशासनाच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे.

पंचायत क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनात अनेक कामगारा कंत्राटी पद्धतीने काम करतात. त्यांच्या किरकोळ समस्यांकडेही दुर्लक्ष केले जाते. त्यांचे हक्कदेखील त्यांना मिळत नसल्यामुळे संघटनेच्या वतीने मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनाने कामगारांच्या हक्कांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून जिल्हा अधिकारी यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना देऊनही फरक पडलेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव गोंडपिपरी नगर पंचायतचे विरोधात उपोषण करण्यात येत आहे. जो पर्यंत आमच्या कायदेशीर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा उपोषण सुरूच राहणार आहे असे सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष रवि गेडाम यांनी इंडिया दस्तक टीव्ही न्यूज चॅनलशी बोलतांना सांगितले.