ब्रेकिंग न्यूज! नागपुरात एका पती-पत्नीची मुलीसह सामूहिक आत्महत्या…

0
507

नागपूर : नागपुरात एका पती-पत्नीने मुलीसह सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी ही घटना घडली. जिल्ह्याच्या आंभोरा येथील वैनगंगा नदी पात्रातील बॅक वॉटरमध्ये या कुटुंबाने आत्महत्या केली.

Advertisements

नागपूर जिल्ह्याच्या आंभोरा येथील वैनगंगा नदी पात्रातील बॅक वॉटरमध्ये एका दाम्पत्याने मुलीसह सामूहिक आत्महत्या केली. श्याम गजानन नारनवरे (वय 46), सविता श्याम नारनवरे (वय 35) आणि समीक्षा श्याम नारनवरे (वय 12) अशी तिघांची नावे आहेत. हे दाम्पत्य नागपूरच्या वाठोडा येथील अनमोल नगरचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

Advertisements

आंभोरा येथील वैनगंगा नदी पात्राजवळ दुचाकी उभी असल्यानं स्थानिकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढले.

यावेळी तिघांचे हात एकमेकांना ओढणीने बांधलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे या तिघांनी एकत्र सामूहिक आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. तरीही या तिघांनी आत्महत्येसारखं टोकांचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी वेलतूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केलाय.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here