डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त रक्तदान शिबिर; ४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान…

337

अजय चोथमल
प्रतीनीधी मेडशी

मानोरा शिवाजीनगर धामणी मानोरा आज येथे 5 डिसेंबर 2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्य 6 डिसेंबर च्या पूर्वसंध्याला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन उत्तुंग फाउंडेशन मार्फत करण्यात आले होते.शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सन्देशकुमार किर्दक यांनी केले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव खडसे,प्रेस क्लब चे अध्यक्ष उपेंद्र पाटील, माणिक डेरे, असलम पोपटे,संजय अलदर तलाठी वामन नवघरे आदी उपस्थित होते.
‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात एकूण 45 रक्तदाते यांनी रक्तदान केले. वाशिम येथिल शासकीय रक्तपेढ़ी चे डॉ. उदगीरे, कर्मचारी एस. बी.मोरे, चंदन वासनिक, सचिन दंडे, गोळे, अतीक यांनी सहकार्य केले. याकरिता नागसेन बुद्ध विहार, शिवाजी नगर, तथागत महाकारुनिक विहार, धामणी, पंचशील मंडळ, गुंडी, पंचशील बुद्ध विहार, जुनी वस्ती, मानोरा, जय बिरसा मित्र मंडळ, शिवाजी नगर व उत्तुंग फाउंडेशन चे सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले आहे.