Home Breaking News जीवनासाठी झुंज देणारी ११ वर्षीय चिमुकली; लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी समाजाकडून मदतीची अपेक्षा…

जीवनासाठी झुंज देणारी ११ वर्षीय चिमुकली; लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी समाजाकडून मदतीची अपेक्षा…

141

जीवनासाठी झुंज देणारी ११ वर्षीय चिमुकली; लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी समाजाकडून मदतीची अपेक्षा

✍🏻दिनेश मंडपे
कार्यकारी संपादक

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ११ वर्षीय सनाया चरणदास मेश्राम ही चिमुकली सध्या जीवन-मृत्यूच्या संघर्षातून जात असून तिच्यावर नागपूर येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गंभीर यकृत विकारामुळे तिचं लिव्हर पूर्णपणे निकामी झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले असून तातडीने Liver Transplant Surgery करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सध्या सनाया अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

डॉक्टरांच्या माहितीनुसार सनायाचा INR 5 पर्यंत पोहोचला असून परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. तिच्यावर प्लाझ्मा विनिमय प्रक्रिया सुरू असून तज्ज्ञ डॉक्टरांकडून तिचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी आवश्यक डोनर तपासणी, कागदपत्रांची पूर्तता, नोटरी प्रक्रिया तसेच दिल्ली येथे आवश्यक परवानग्यांसाठी धावपळ सुरू आहे.

या संपूर्ण उपचार प्रक्रियेसाठी मोठ्या आर्थिक खर्चाची आवश्यकता असून संबंधित कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आई-वडील प्रत्येक दार ठोठावत असून समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हॉस्पिटलच्या बेडवर उपचार घेत असतानाही सनाया हातात रंग घेऊन चित्र काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दृश्य अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणणारे ठरत आहे. बालवयातच आलेल्या या गंभीर आजारामुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले असून तिच्या उपचारासाठी समाजाने पुढे यावे, अशी भावनिक विनंती कुटुंबीयांनी केली आहे.

सनायाच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क / PhonePe : 94058 45085
नाव : Dhammashil Maniram Ramteke (Mama)

Don`t copy text!