Home Breaking News नवसंजीवनी स्वस्त धान्य अतिदुर्गम पहाडी भागात पोहोचले…

नवसंजीवनी स्वस्त धान्य अतिदुर्गम पहाडी भागात पोहोचले…

36

नवसंजीवनी स्वस्त धान्य अतिदुर्गम पहाडी भागात पोहोचले

विशेष प्रतिनिधी बिनागुंडा

भामरागड : शासनाच्या वतीने मान्सून काळात तालुका मुख्यालयापासून संपर्क तुटणाऱ्या अतिदुर्गम गावांमध्ये चार महिन्यांचे अन्नधान्य आगाऊ पोहोचविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा गावात स्वस्त धान्य दुकानाचे अन्नधान्य यशस्वीरित्या पोहोचविण्यात आले.

बिनागुंडा येथील स्वस्त धान्य दुकानामार्फत १७५ शिधापत्रिकाधारकांना तब्बल ६०३ नागरिकांचे धान्य वितरित करण्यात येणार आहे. पावसाळ्यात रस्ते आणि संपर्क व्यवस्था खंडित होत असल्याने नागरिकांना अन्नधान्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. मात्र शासनाच्या या उपक्रमामुळे आता पहाडी भागातील नागरिकांची अन्नधान्याची चिंता मिटली असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात वेळेपूर्वी धान्य पोहोचविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.

भामरागड तालुक्यातील बिनागुंडा येथे आज पर्यंत रस्ता नव्हता मात्र याच वर्षी पोलिस विभागाने येथे पोलिस मदत केंद्राची स्थापना केल्याने बिनागुंडा येथे थेट आता वाहन पोहचू शकत आहे हे विशेष.

Don`t copy text!