Home Breaking News नेलगुंडा येथे शेतात घुसून धारदार शस्त्राने शेतकऱ्याची हत्या; दोन आरोपी अटकेत…

नेलगुंडा येथे शेतात घुसून धारदार शस्त्राने शेतकऱ्याची हत्या; दोन आरोपी अटकेत…

245

नेलगुंडा येथे शेतात घुसून धारदार शस्त्राने शेतकऱ्याची हत्या; दोन आरोपी अटकेत

प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार भामरागड
नेलगुंडा (ता. भामरागड, जि. गडचिरोली) येथे दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी रात्रीच्या सुमारास एका शेतकऱ्याची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. इसम नाव – पुसु नारंगो हवके हे व त्यांची पत्नी दसरी पुसु हवके आपल्या शेतात मोहाच्या झाडाजवळ शेकोटीजवळ झोपलेले असताना रात्री अंदाजे 11.00 ते 12.00 वाजताच्या दरम्यान अज्ञात इसमांनी पुसु नारंगो हवके यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी फिर्यादी दसरी पुसु हवके यांनी पोलीस स्टेशन नेलगुंडा येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीस स्टेशन नेलगुंडा येथे गुन्हा क्रमांक 01/2026 भा.दं.वि. कलम 302 अन्वये दिनांक 11/02/2026 रोजी 103(1) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल सोडके यांनी हाती घेतला.
तपासादरम्यान सखोल चौकशी व साक्षीदारांचे जबाब नोंदवून संशयित आरोपी म्हणून
प्रकाश विजय वाचामी (वय 23 वर्षे)
दीपक डोंगे वडे (वय 24 वर्षे)
रा. नेलगुंडा, ता. भामरागड, जि. गडचिरोली
यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी सांगितले की, मृतक पुसु नारंगो हवके हा त्यांना जादूटोण्याच्या कारणावरून वारंवार धमक्या देत होता व याच कारणावरून त्यांच्यात वाद होत होते. घटनेच्या दिवशी रात्री आरोपींनी संगनमत करून शेतात जाऊन प्रथम कुन्हाडीने वार केला. मृतक जिवंत असल्याचे लक्षात येताच पुन्हा दोन वेळा गळ्यावर वार करून हत्या केली. त्यानंतर मृतदेह ब्लँकेटने झाकून पळ काढला.
तपासात गुन्हा निष्पन्न झाल्याने आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन भामरागड येथे वर्ग करण्यात आले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक गडचिरोली, अपर पोलीस अधीक्षक अहेरी व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमोल साळुंके, पोहेकॉ. विक्रम बुंगे, पोलीस पाटील/पिटराम मडावी, पोलीस जवान प्रशांत चुघरे, बाबाराव पल्लो, गणेश शिंगावार, हर्षल धानोकर, अक्षय वामनवाडे, पोलीस नायक संजय चव्हाण (पो.स्टे. नेलगुंडा) तसेच सहकारी पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Don`t copy text!