Home Breaking News एटापल्ली येथे मकर संक्रांतीनिमित्त पहिल्यांदाच भव्य पतंग उत्सव…

एटापल्ली येथे मकर संक्रांतीनिमित्त पहिल्यांदाच भव्य पतंग उत्सव…

89

एटापल्ली येथे मकर संक्रांतीनिमित्त पहिल्यांदाच भव्य पतंग उत्सव.

श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळा तर्फे आयोजन

५३ स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; नागरिकांचा उदंड प्रतिसाद

तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार एटापल्ली 

एटापल्ली : मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त एटापल्ली शहरात श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळ, एटापल्ली यांच्या वतीने पहिल्यांदाच भव्य पतंग उडविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला शहरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून, एकूण ५३ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सजले असून, लहान मुले, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमामुळे संक्रांतीचा सण आनंद, उत्साह व सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा झाला.
या कार्यक्रमास नगरपंचायत अध्यक्षा रेखा मोहूर्ले, बांधकाम सभापती निर्मला कोंडबतुलवार, मुख्याधिकारी प्रणय तांबे, गटशिक्षणाधिकारी ऋषीकेश बुरुडकर, संस्कार पब्लिक स्कूलचे संस्थापक विजय सुंकेपाकवार, तसेच श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळाचे मार्गदर्शक संतोष गंदेशिरवार, गणेश खेडेकर, अमोल गजाडीवार, पंकज पत्तीवार, संपत पैडाकुलवार व मंडळाचे सदस्य उमेश संगर्ती, राघव सुल्वावार, अनिकेत मामीडवार, राहुल कुळमेथे, रोहित बोमकंटीवार, आदित्य चिप्पावार, तनुज बल्लेवार, प्रज्योत बल्लेवार, सुमित नाडमवार यांची उपस्थिती लाभली.
मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करून युवकांनी अशा सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडले असून, नागरिकांनी “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” या संदेशासह संक्रांतीचा सण आनंदाने साजरा केला.

Don`t copy text!