Home Breaking News देशातील पहिली क्रीडा दिंडी आनंदवनात संपन्न दिला नशामुक्तीचा संदेश…

देशातील पहिली क्रीडा दिंडी आनंदवनात संपन्न दिला नशामुक्तीचा संदेश…

201

देशातील पहिली क्रीडा दिंडी आनंदवनात संपन्न दिला नशामुक्तीचा संदेश

प्रतिनिधी संकेत कायरकर वरोरा

आनंदवन, १५ जानेवारी २०२६: महारोगी सेवा समिती, वरोरा संचलित आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन यांच्या वतीने ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांच्या जयंती औचित्य साधून महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनानिमित्त आयोजित क्रीडा दिंडीला आज सकाळी ९:०० वाजता महाविद्यालयाच्या मैदानावरून श्री जे एस मूर्ती,प्रमुख. साई वर्धा पॉवर जनरेशन प्रा लि, श्री सुधाकर कडू विश्वस्त महारोगी सेवा समिती, वरोरा, डॉ मृणाल काळे, प्राचार्य आनंद निकेतन महाविद्यालय, उपप्राचार्य प्रा राधा सवाने, क्रीडा अधिकारी श्री मोरेश्वर गायकवाड, श्री रवींद्र नलगिंतवर, श्री दीपक शिव, श्री भासरकर, श्री बांगडकर, श्री राजेश ताजणे आदी अतिथींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून क्रीडा दिंडीला आनंद निकेतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरून प्रारंभ झाला. दिंडीचा मार्ग आनंद निकेतन महाविद्यालय → आनंदवन चौक → छत्रपती शिवाजी महाराज चौक → विनायक लेआउट मार्गे → चंद्रपूर–नागपूर हायवे → आनंदवन चौक → आणि ११:३० वाजता आनंद निकेतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर राष्ट्रगानाने समापन झाले.

देशातील पहिली क्रीडा दिंडी म्हणून चर्चेत असलेल्या या उपक्रमामध्ये आनंद निकेतन महाविद्यालयासह , आनंद अंध विद्यालय, आनंद माध्यमिक विद्यालय, आनंद मूकबधिर विद्यालय, संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा, संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा, विवेकानंद माध्यमिक विद्यालय, एस ए योगा इंस्टिट्यूट, वरोरा, रोटरी क्लब, वरोरा, जिल्हा परिषद शाळा आनंदवन, फौजी कराटे ग्रुप वरोरा या सर्व शाळेतील व क्रीडा क्लब मधील खेळाडू, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक आणि क्रीडा प्रेमींनी अश्या एकूण पेक्षा अधिक संख्येने सहभागी होऊन नशामुक्तीचा संदेश दिला.

क्रीडा दिंडीच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, आरोग्य, शिस्त, संघभावना तसेच नशामुक्त जीवनशैलीचे महत्त्व प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात आले. क्रीडा दिंडीमध्ये भारतीय पारंपारिक क्रीडा व व्यायाम प्रकारांचे तसेच ३५ विविध क्रीडाप्रकारांचे प्रदर्शन नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.

आयोजकांनी क्रीडा दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले. महारोगी सेवा समिती, वरोरा चे सचिव डॉ विकास आमटे, विश्वस्त कौस्तुभ आमटे, सौ पल्लवी आमटे, डॉ विजय पोळ, सुधाकर कडू, माधव कवीश्वर, सदाशिव ताजणे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृणाल काळे, उपप्राचार्य प्रा राधा सवाने यांनी क्रीडा दिंडीच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. तानाजी बायस्कर, श्री सचिन साळुंखे, श्री उमेश घुलक्षे, शौकत खान, प्रा मोक्षदा मनोहर, प्रा संदीप पारखी, प्रा राठोड, प्रा तिलक ढोबळे, प्रा हेमंत परचाके, प्रा नीरज आत्रम , तुषार पारखी, अभिजीत अष्टकार, मुकेश खंगार व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व आयोजन समितीतील सर्व खेळाडूचे अभिनंदन केले.

Don`t copy text!