Home Breaking News राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत लोकबिरादरी आश्रम शाळेच्या खेळाडूंचे घवघवीत यश…

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत लोकबिरादरी आश्रम शाळेच्या खेळाडूंचे घवघवीत यश…

113

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत लोकबिरादरी आश्रम शाळेच्या खेळाडूंचे घवघवीत यश

तालुका प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार
भामरागड ता.१७- एकात्मिक आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धा ०४ ते ०७ जानेवारी २०२६ ला अमरावती येथे पार पडल्या. यामध्ये लोकबिरादरी आश्रम शाळा हेमलकसाच्या ७२ खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता; त्यापैकी वैयक्तिक खेळ प्रकारात २३ सुवर्णपदक,२० रजत व ०५ कांस्यपदक तर सांघिक खेळप्रकारात ०६ प्रथम,०६ द्वितीय तर ०३ तृतीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.तद्वतच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागपूर विभागाला उपविजेतेपद मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.
आदीवासी विकास विभाग नाशिकअंतर्गत अमरावती येथे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा ०४ ते ०७ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडल्या. यामध्ये वयोगट १४, १७ व १९ वर्ष वैयक्तिक खेळ प्रकारात व सांघिक खेळात लोकबिरादरीच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी घवघवीत योगदान दिले.
यामध्ये मैदानी खेळात. 100 मी, 200 मी, 400 मी, 800 मी, 1500 मी, 3 किमी धावणे/ चालणे 4×100 रिले, 4×400 रिले, गोळा फेक, भाला फेक, थाळी फेक, उंच उडी, लांब उडी क्रीडा प्रकारात यश प्राप्त केले. 14 वर्ष मुली मुले खोखो, 17 वर्ष मुली मुले खोखो व 14 वर्ष मुली मुले हॅन्डबॉल 17 मुले व 19 वर्ष मुली हॅन्डबॉल खेळात यश प्राप्त केले. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून सूरज दुर्वा (१७ वर्षे वयोगट) व रोशनी पुंगाटी (१९ वर्षे वयोगट) यांचा आदिवाशी विकास विभागातर्फे सत्कार करण्यात आला व सायकल भेट देण्यात आली. भामरागड प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत व सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोशना चव्हाण तसेच भामरागड प्रकल्पाचे क्रीडा समन्वयक निलेकर सर यांनी उपविजेतेपद मिळवून दिल्याबद्दल प्रकल्पाच्या सर्व खेळाडूंचे व क्रीडाशिक्षकांचे कौतुक केले. जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाशभाऊ आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक विवेक दुबे, हन्डबाल प्रशिक्षक अमोल बावनकर, ज्योती सडमेक यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकबिरादरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिगंत आमटे, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. अनघा आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, आश्रम शाळेच्या संचालिका समिक्षा आमटे, मुख्याध्यापक गिरीष कुलकर्णी, शरिफ शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Don`t copy text!