Home Breaking News भाजपच्या कोट्यवधींच्या विकासाच्या खोट्या थापा,भाजपने चंद्रपूर शहराची लावली वाट…

भाजपच्या कोट्यवधींच्या विकासाच्या खोट्या थापा,भाजपने चंद्रपूर शहराची लावली वाट…

205

भाजपच्या कोट्यवधींच्या विकासाच्या खोट्या थापा,भाजपने चंद्रपूर शहराची लावली वाट

चंद्रपूर निवडणुकीत – प्रभाग 15 च्या प्रचार सभेतून काँग्रेस विधिमंडळ नेते यांनी भाजपवर साधला निशाणा

मुख्य संपादक मुन्ना तावाडे
चंद्रपूर, दि. ९ – चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज प्रभाग क.१५ विठ्ठल मंदीर येथे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची प्रचार सभा पार पडली. या सभेस प्रवीण पडवेकर, अनिल शिंदे, जुनैद खाँन, वैद्यजी, कुणाल चहारे, सागर वानखेडे मंचावर उपस्थित होते.
प्रभाग 15 विठ्ठल मंदिर वॉर्ड येथील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार सौ.शोभा शरदचंद्र वाघमारे,श्री.राजू गजानन बनकर , सौ.राधा प्रफुल्ल पुलगमकर श्री.सौरभ अरूण ठोंबरे उपस्थित होते.

आजच्या सभेस संबोधित करताना काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, चंद्रपूर महानगरपालिका काबीज करण्यासाठी भाजप ज्या 2200 कोटींचा विकासाचा पाढा वाचत आहे तो पूर्णतः खोटा असून अमृत योजना व भूमिगत योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला. या योजनेतून नागरिकांना काहीच मिळाले नाही, उलट भाजपचे सत्ताधारी व कंत्राटदार मात्र मालामाल झाले आहेत. येथे आजही पिण्याच्या पाण्याची समस्या, सांडपाणी,कचऱ्याची विल्हेवाट, पथदिवे, रस्ते, शिक्षण आरोग्याची समस्या कायम असून आपण काँग्रेसला निवडून दिल्यास काँग्रेसचे नगरसेवक नागरिकांसाठी काम करतील. गोरगरिबांच्या मुलांना मोफत आणि चांगले शिक्षण मिळावे, इंग्रजी माध्यमांच्या शाळा उपलब्ध व्हाव्यात , आरोग्यासाठी प्रशस्त रुग्णालय, शुद्ध पेयजल, स्वच्छ रस्ते, उत्तमप्रकारे सांडपाणी विल्हेवाट करिता नाल्याचे नियोजन हा काँग्रेसचा अजेंडा असणार. म्हणून आपण सर्वांनी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करावे असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

Don`t copy text!