जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेगडीची शैक्षणिक सहल कर्मवीर कन्नमवार जलाशय येथे संपन्न
प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
रेगडी (ता. चामोर्शी) :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेगडी येथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमांचा भाग म्हणून नुकतीच कर्मवीर कन्नमवार जलाशय येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. या सहलीत विद्यार्थ्यांनी जलाशयाची रचना, पाणीसाठा, जलसंधारणाचे महत्त्व तसेच पर्यावरण संरक्षणाबाबत प्रत्यक्ष माहिती घेतली.
सहलीदरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाणी व्यवस्थापन, सिंचन व्यवस्था व जलाशयाचे सामाजिक-आर्थिक महत्त्व समजावून सांगितले. प्रत्यक्ष निरीक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली असून त्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपली उत्सुकता व्यक्त केली.
या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरील ज्ञान मिळाले तसेच निसर्गाबद्दल जाणीव व पर्यावरण संवर्धनाची भावना निर्माण झाली. सहल यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कुणाल धकाते सर, शिक्षकवृंद व पालकांनी विशेष सहकार्य केले.







