संपादक प्रशांत बिट्टूरवार
चंद्रपूर :
चंद्रपूर शहरात घरफोडी व चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी रामनगर पोलिसांनी प्रभावी कारवाई करत दरवाजे-खिडक्या दुरुस्तीच्या बहाण्याने शहरातील बंद घरांची रेकी करून घरफोडी करणाऱ्या परराज्यातील आरोपीस अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे रु. १९,८४,०००/- किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.
मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालून दाखल गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांनी रामनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक असिफराजा शेख यांना विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शोध पथकाला घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश देण्यात आले.
पोलीस स्टेशन रामनगर येथे दाखल अपराध क्र. १०३५/२०२५ व १०३६/२०२५ (भा.न्या.सं. कलम ३३१(२), ३३१(३), ३३१(४), ३०५) या दोन्ही गुन्ह्यांची पद्धत समान असल्याचे तपासात आढळून आले. तांत्रिक तपास व गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती घेतली असता मुस्तकीन मोहम्मद शौकीन चौधरी (वय ४३), रा. मेरठ (उ.प्र.), सध्या चंद्रपूर येथे किरायाने राहणारा, हा घरांची दारे-खिडक्या बसविणे व दुरुस्तीचे काम करण्याच्या बहाण्याने बंद घरे हेरून कारमधून ये-जा करून घरफोडी करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत मुद्देमाल विक्रीसाठी नेत असताना त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण रु. १९.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीकडून पुढील तपास सुरू असून याच प्रकारातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, सहा. पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, स.पो.नि. निलेश वाघमारे तसेच पोलीस अंमलदार लालू यादव, शरद कुडे, आनंद खरात, बाबा नैताम, रामप्रसाद नैताम, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, रविकुमार ढेंगळे, संदीप कामडी, प्रफुल पुप्पलवार, सुरेश कोरवार, ब्ल्युटी साखरे व पंकज पोंदे यांनी यशस्वीरीत्या केली.








