येल्ला येथील गंगा माता पूजेला काँग्रेस नेते अजय कंकडालवार दाम्पत्यांची उपस्थिती…!

160

येल्ला येथे तीन दिवसीय गंगा मातेची पूजा कार्यक्रम उत्साहातहात

प्रतिनिधी रूपाली रामटेके

मुलचेरा : तालुक्यातील येल्ला येथे ओडेवार समाजाकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही तीन दिवसीय गंगा माता पूजन कार्यक्रम भक्तिमय वातावरणत मोठ्या उत्साहात संपन्न झालं आहे.

ओडेवार समाजाकडून आयोजित गंगा माता पूजेच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार व माजी उपसभापती सौ.सोनाली कंकडालवार यांना निमंत्रण देण्यात आली होती. या निमंत्रणाला मान देऊन आज गंगादेवी पूजन कार्यक्रमाला अजय कंकडालवार दाम्पत्य यांनी उपस्थित राहून गंगा देवीची विधिवत पूजा अर्चना करून देवीची दर्शन घेतले.

त्यावेळी कंकडालवारांनी देवीच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केली तसेच येथील स्थानिक समस्या जाणून घेत गंगा देवी पूजा कार्यक्रमला आपल्यापरीने वर्गणी देण्यात आली.

यावेळी वंदना दुर्गे (सरपंच माहगाव ) अजय नैताम मा.जि. सदस्य,वेंकाटेश धानोरकर,कालिदास कुसन्नाके,अजय नैताम,दिनेश मडिवी, गीरमाजी मडामी, बंडु सेडमाके , गुलाब सेडमाके, सामराव कोरेते, अशोक आत्राम, संतोष हजारे, नामदेव आत्राम,बंडु उराडे, सतिश पानेम ( ओडीगुडम) भिमराव गौरपवार ( कुनघाडा) मुत्ता टेकुलवार (कुनघाडा) पोचम बट्टीवार ( चपराळा) चोटु भाई , आनंद भाऊ, दुर्गे सर,नंदु सिडाम यांच्या सह मंडळाचे सदस्य,स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.