सिमूनतला येथे अपघातग्रस्त कार्यकर्त्यांची भाजप बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांच्या हस्ते भेट – योग्य उपचारासाठी दिले मार्गदर्शन, तातडीची मदत करून दाखवली कार्यकर्ताभिमुख भूमिका
प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत सिमूनतला येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या मोटारसायकल अपघातात भाजपचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते सुरेशजी मिस्त्री गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर तत्काळ ग्रामपंचायत सदस्य रंजन बचाड यांनी सामाजिक जबाबदारी जपत तातडीने रुग्णालयात जाण्याची व्यवस्था करून दिली. तसेच त्यांनी ही माहिती भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांना फोनवर कळवली.
सूचना मिळताच सुरेश शहा यांनी तातडीने प्रतिसाद देत जखमी कार्यकर्त्यांसाठी आवश्यक ती सर्व मदत उभी केली. त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी थेट संवाद साधत उपचार प्रक्रियेबाबत आवश्यक तपासण्या त्वरीत करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या हस्तक्षेपामुळे सुरेशजी मिस्त्री यांच्या उपचार प्रक्रियेला गती मिळाली.
आज पहाटेच जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांनी स्वतः रुग्णालयात भेट देऊन अपघातग्रस्त कार्यकर्त्यांची विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत त्यांना धीर देत लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा होऊन घरी परत यावे, अशी मनापासून प्रार्थना केली. कार्यकर्त्यांच्या संकटाच्या काळात नेतृत्व कसे खांद्याला खांदा लावून उभे राहते याचा आदर्श या भेटीद्वारे दिसून आला.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते तारक हलदार, सोम बैद्य उपस्थित होते. स्थानिक पातळीवर या घटनेची चर्चा होत असून जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांची कार्यकर्त्यांप्रती असलेली संवेदनशीलता आणि तत्पर मदत यांचे सर्वत्र कौतुक व्यक्त केले जात आहे.







