काँग्रेसच्या आढावा बैठकीमुळे नगर परिषद निवडणुकांच्या रणनितींना वेग…

94

विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात उमेदवार सज्ज

संपादक प्रशांत बिट्टूरवार

पुढील महिन्यात होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, नागपूर विभाग निवडणूक प्रमुख आ. विजय वडेट्टीवार यांनी पक्षाचे उमेदवार चाचपणी, ते उमेदवारी नामांकन दाखल प्रक्रियेनंतर आता थेट उमेदवारांना आढावा बैठकीतून विशेष मार्गदर्शन करीत प्रत्येक ठिकाणी विजयासाठी कंबर कसली आहे. यामुळे उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकींमुळे नगर परिषद निवडणुकांच्या रणनितींना वेग आला आहे.

विधिमंडळ पक्षनेते तथा काँग्रेस नागपूर विभाग निवडणूक प्रमुख आ. विजय वडेट्टीवार यांनी संपूर्ण नागपूर विभागात बैठकांचे सत्र सुरू केले. यात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, भिसी, नागभीड, ब्रम्हपुरी, घुग्गुस, बल्लारपूर, मुल तर गडचिरोली जिल्ह्यात वडसा, आरमोरी, व गडचिरोली येथे नुकत्याच आढावा बैठका पार पडल्यात. या बैठकींमध्ये पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांना विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी विजयासाठी जनतेच्या मनात स्थान निर्माण करणे हेतू करावयाचे प्रयत्न, पक्षाचे ध्येय धोरण, विचार, आगामी काळात करावयाची विकासकामे, तसेच नागरिकांशी करावयाचा प्रेमळ संवाद याबाबत विश्वास मार्गदर्शन केले. तसेच उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांना त्यांची नाराजी तसेच निवडणुकीत संभाव्य होणारी गटबाजी दूर करत त्यांना विशेष जबाबदारी देऊन पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्यासाठी व पक्षनिष्ठा कायम राखण्यासाठी मार्गदर्शन केले.

देशात धर्मांधतेचे विष पेरत जाती – जाती मध्ये भांडणे लाऊन लोकशाहीच्या नीतिमूल्यांची गळचेपी करणाऱ्या हुकूमशाही व मनुवादी विचाराच्या भाजपला धडा शिकविण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच आघाडीत सहभागी समविचारी घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजूट, एकसंघ होऊन यशस्वी लढा उभारावा असेही त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आढावा बैठकीत आवाहन केले. विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष “किंचित’ होईल. अशी टीका करणारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत भाजपला “चिंतित’ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा पलटवार देखील त्यांनी यावेळी केला. पर पडलेल्या आढावा बैठकीत भाजप सह अनेक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्ष प्रवेश केला. तसेच आयोजित बैठकींना सर्व स्तरावरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी बैठकींना काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.