Home Breaking News फुलनार (कॅम्प गुणडूरवाही) येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना…

फुलनार (कॅम्प गुणडूरवाही) येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना…

363

जिल्हा प्रतिनिधी सतीश कुसराम

गडचिरोली:
1000 सी–60 कमांडो, 21 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात उभारले नवीन पोलीस मदत केंद्र
अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. श्री. छेरिंग दोरजे, उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली श्री. सुहास गाडे, 37 बटा. चे कमांडण्ट श्री. दाओ इंजीरकन कींडो, इतर वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थंाच्या उपस्थितीत पार पडले नवीन पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन
नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना ही या भागाची सुरक्षा आणि स्थानिक नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता मैलाचा दगड ठरेल … पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल
सन-2023 पासूनच्या सुरक्षा पोकळी कमी करण्यासाठीच्या साखळीमधील 8 व्या नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना
नुकतेच दिनांक 28/10/2025 रोजी राज्य शासनाने दिली होती फुलनार (कॅम्प गंडूरवाही) येथे पोलीस मदत केंद्र स्थापनेस मंजुरी

माओवाददृष्ट¬ अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा दुर्गम-अतिदुर्गम भाग असलेला आहे, ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत, त्यंचा विकास साधावा व माओवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. भामरागड पासून 20 किमी. व छत्तीसगड सिमेपासुन फक्त 07 किमी अंतरावर असलेल्या अति-दुर्गम भागातील नागरिकांची सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून ते विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता पोलीस मदत केंद्र फुलनार कॅम्प गंुंडुरवाही मैलाचा दगड ठरेल. सन 2024 वर्षाअखेर दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्र, दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी नेलगंुडा येथे नवीन पोलीस स्टेशनची व दिनांक 09 मार्च 2025 रोजी याच भागात कवंडे येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात येऊन अति-दुर्गम भागातील नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यात आली आहे. तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांद्वारे या भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जात आहे.

सदर पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण 1050 मनुष्यबळ, 04 जेसीबी, 07 ट्रेलर, 02 पोकलेन, 25 ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसात पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली. सदर पोलीस मदत केंद्रामध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 12 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, 08 सँन्ड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस मदत केंद्राच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 03 अधिकारी व 50 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 14, संभाजी नगर सी कंपनीचे 02 प्लाटुन तसेच सिआरपीएफ 37 बटा. एफ कंपणीचे 01 असिस्टंट कमांडन्ट व 62 अधिकारी/अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 08 पथक (200 कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोलीस मदत केंद्राच्या उभारणी कार्यक्रमादरम्यान जनजागरण मेळावा आयोजित करुन पोलीस मदत केंद्र फुलनार (कॅम्प गंुडूरवाही) हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना साड¬, चप्पल, पुरुषंाना घमेले, ब्लॅकेट, स्वयंपाक भांड¬चा संच, मच्छरदानी, युवकांना लोअर पॅन्ट, टि-शर्ट, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, कंपास, चॉकलेट, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, क्रिकेट स्टंप संच, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. फुलणार येथील नवीन पोलीस मदत केंद्राच्या उभारणीमुळे मौजा फुलनार व मौजा कोपर्शी येथील अडकलेले मोबाईल टॉवरचे बांधकाम पुर्ण करण्यास मदत होणार आहे. यासोबतच वाढलेल्या सुरक्षेमुळे भविष्य काळात या अतिदुर्गम भागात नवीन रस्ते बांधकाम तसेच एस. टी. बस सेवा सुरु करणे शक्य होणार असून अतिदुर्गम भागात नवीन पोलीस मदत केंद्राच्या उभारणीमुळे तेथील नागरिकांनी संतोष व्यक्त करुन पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले.

सदर नवीन पोलीस मदत केंद्र उभारणीच्या कार्यक्रमाप्रसंगी अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. श्री. छेरिंग दोरजे, उप-महानिरिक्षक (अभियान), सीआरपीएफ श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली श्री. सुहास गाडे, कमांडण्ट 37 बटा. सीआरपीएफ श्री. दाओ इंजीरकन कींडो, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक धानोरा श्री. अनिकेत हिरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड श्री. अमर मोहिते व पोलीस मदत केंद्र फुलनार (कॅम्प गुंडुरवाही) चे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि. युवराज घोडके, इतर अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.

Don`t copy text!