रेगडी येथे ग्रामीण रबरी बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन…

372

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
रेगडी :
बिरसा मुंडा क्रिकेट क्लब, रेगडी यांच्या वतीने आयोजित ग्रामीण रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. रेगडी येथे २३ नोव्हेंबर २०२५ पासून या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटन सोहळा माजी आमदार देवराव होळी यांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ शाहा, भाजपचे जिल्हा सचिव दिलीप चलाख, शिवसेनेचे जिल्हा सचिव प्रशांत शाहा, सौ. सुरेखाताई गेडाम (सरपंच), सुधाकर नरोटे,देवराव खंडरे,बालाजी नेवारे, उमेश मल्लिक, आकाश कुळमेथे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

स्पर्धेला ग्रामीण पातळीवर चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील तब्बल ४४ संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे. खेळाडूंच्या कौशल्याला वाव देणे, ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट करणे या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचा रोमांच अखेरपर्यंत टिकणार असून अंतिम सामना ९ डिसेंबर २०२५ रोजी पार पडणार आहे.
स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष रमेश मन्नो,राहुल गावडे,संतोष वड्डे, राकेश नरोटे,रोहित गावडे, व सर्व खेळाडूनि म्हेनत घेतले आहे

ग्रामीण भागात क्रीडा महोत्सवासारखे वातावरण निर्माण करणारी ही स्पर्धा खेळाडू व क्रीडारसिकांसाठी आकर्षक ठरणार आहे.