विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते,आ.विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती
संपादक प्रशांत बिट्टूरवार
मागील दहा वर्षापासून ब्रम्हपूरी विधानसभेचे लोकप्रतीनीधीत्व भुषविणारे राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरी मतदारसंघांचा चेहरामोहरा विकासकामात्मक दुरदृष्टीकोनातुन बदलविला आहे. ब्रम्हपूरीच्या या विकासात्मक बदलामुळे राज्यात ब्रम्हपूरी शहराची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. शहरातील विविध शासकीय कार्यालयांच्या प्रशस्त इमारती व इतर भौतिक सोयीसुविधांनी शहराच्या सुंदरतेत भर घातली आहे. या सर्व विकासकामांनी भारावून जात ब्रम्हपूरी शहरातील पटेलनगर प्रभागातील अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
ब्रम्हपूरी शहरातील कमलाई निवासस्थानी विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व अनिल दोनाडकर, प्रा.रवी मैंद, सौ.किर्ती रमेश पारधी यांच्या नेतृत्वाखाली सदरचा पक्षप्रवेश पार पडला आहे.
पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये किर्ती रमेश पारधी, जयश्री अनिल बावनकसे, पल्लवी विवेक नरूले, छाया जगदीश उरकुडे, गायत्री गुलाब उरकुडे, गायत्री सचिन निशाने, मंगला देविदास ठाकरे, वंदना नेवारे, वैशाली सराटे, वैभव सराटे, हितेश सोमेश्वर कुंभारे, अंकुश पाडवार, योगेश पारधी, मारोती बागडे, शरद खलोदे, गुणवंत पाडवार, निखील पातर, शुभम पाडवार, मयुर नेवारे, राहुल कुंभरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, मनोज वझाडे, अर्पिता अनिल दोनाडकर, सपना संजय बल्लारपुरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या प्रवेशामुळे शहरातील पटेलनगर प्रभागात भाजपला मोठी खिंडार पडली असुन काॅंग्रेस पक्षाची ताकद या प्रभागात वाढलेली आहे. नागरिकांचा काॅंग्रेस पक्षावरील विश्वास दिवसेंदिवस वाढलेला दिसतो आहे.







