Home Breaking News भारताच्या वाघिणी ठरल्या जगज्जेत्या!…

भारताच्या वाघिणी ठरल्या जगज्जेत्या!…

230

इंडिया दस्तक न्यूज टीव्ही वृत्त

जागतिक महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अत्यंत चुरशीची लढत देत भारतीय महिला खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेला नमवले. या कामगिरीसाठी तसेच विश्वचषकाला गवसणी घातल्याबदल भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन!
भारतीय महिला संघाने आज सुरुवातीपासूनच चांगला खेळ केला. शेफाली वर्मा (८७), दिप्ती शर्मा (५८), स्मृती मनधाना (४५), तसेच रिचा घोष, जेमिमा राॅड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या अचूक फलंदाजीच्या जोरावर २९९ धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेपुढे त्यांनी उभे केले. ते पुरे करताना दक्षिण आफ्रिका संघाची पुरेवाट झाली.
या विश्वचषक मालिकेतच भारतीय महिला खेळाडूंनी उत्तम खेळाचे प्रदर्शन केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर अव्वल स्थानी आले आहे. उत्तुंग सांघिक कामगिरीमुळे भारतीय महिला संघाने विश्वचषकाला गवसणी घालत इतिहास रचला आहे.

Don`t copy text!