रेगडी परिसरात धानपिकाचे मोठे नुकसान,थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहचले भाजपचे सुरेश भाऊ शाहा.
प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
रेगडी : चामोर्शी तालुक्याच्या रेगडी परिसरात २९ ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे परिसरातील धान,मक्का व कापूस पिकांचे – मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे पीक जमीनदोस्त झाले आहे.
रेगडी परिसरातील विकासपल्ली, माडेआमगाव, पोतेपल्लि, पलसपूर, पुसगुडा,मक्केपल्लि, गोलबंद्री या गावांमध्ये हलक्या व मध्यम प्रतीच्या धानाची लागवड करण्यात आली होती. मात्र, अचानक झालेल्या वादळी पावसामुळे पीक जमीनदोस्त झाले.
शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सुरेश शहा यांनी पाहणी केली असता या वेळी ,रोहिदास नरोटे, आकाश नरोटे,देवराव खंडरे, दिलीप नेवारे, आकाश कुळमेथे, उमेश मल्लिक,प्रकाश गावडे,प्रशांत मोहुर्ले, सुरेश गावडे, कारू नरोटे,अमित चक्रवर्ती,व शेतकरी उपस्थित होते.
पिकांची पाहणी करताना सरपंचा सुरेखा गेडाम व ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.
हातात आलेले पीक पावसामुळे पूर्णतः नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची दखल घेत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी तसेच सरसकट कर्जमाफी जाहीर करावी.
अशी मागणी यावेळी भाजपा बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शाहा यांनी केली आहे.







