प्रतिनिधी सिद्धार्थ दहागावकर
राजुरा विधानसभेचे आमदार माननीय देवराव दादा भोंगडे यांच्याकडे चकबापूर येथील हनुमान मंदिरासाठी नवीन इमारत मंजूर करण्याबाबतचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने सादर करण्यात आले. या निवेदनावर माननीय आमदारांनी लवकरात लवकर मंजुरी देण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना संतोष मुगलवार (ग्रामपंचायत सदस्य सकमूर), विनोद काळे, समीर कंटीवार, अजय लिंगे, विकास लिंगे, रुपेश गिरसावले, ऋषी वाकुडकर, केसराज दिवशे, अरुण भोगेकर, रामदास चाणकापुरे, संजय काळे तसेच सकमूर व चकबापूर येथील सर्व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी गावातील अनेक महिला मंडळींचीही उपस्थिती होती. हनुमान मंदिराच्या नवीन इमारतीमुळे गावातील धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना अधिक गती मिळणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.







