Home Breaking News डॉ. कार्तिक उराव जयंती उत्साहात साजरी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे...

डॉ. कार्तिक उराव जयंती उत्साहात साजरी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे कार्यक्रमाचे आयोजन…

145

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट

डॉ. कार्तिक उराव जयंती उत्साहात साजरी
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे कार्यक्रमाचे आयोजन

गडचिरोली : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे परिषदचे संस्थापक व आदिवासी समाजाचे महान नेते डॉ. कार्तिक उराव यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते डॉ. कार्तिक उराव यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

डॉ. कार्तिक उराव हे देशातील आदिवासी समाजाच्या एकात्मतेसाठी कार्य करणारे प्रेरणास्थान होते. त्यांनी देशभरातील आदिवासी समाजाला एका छत्राखाली आणण्यासाठी “अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद” या संघटनेची स्थापना केली. त्यांच्या कार्यातून आदिवासी समाजात ऐक्य, आत्मसन्मान आणि हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा मिळाली.

या कार्यक्रमात परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संयुक्त सचिव डॉ. देविदास मडावी, प्रदेश सह सचिव भैयाजी उईके, जिल्हा महासचिव उमेश उईके, जिल्हा सचिव सुरज मडावी, सुलोचना मडावी, शिवाजी नरोटे, अरविंद वाळके, श्याम सलामे, विवेक बैस, सुभाष वळधा, अनिल तुमरेटी, धनराज खोब्रागडे, कालिदास तुमरेटी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

Don`t copy text!