Home Breaking News आरमोरीत ट्रक आणि दुचाकी अपघात दोघांचा मृत्यू तर एक जण बचावला…

आरमोरीत ट्रक आणि दुचाकी अपघात दोघांचा मृत्यू तर एक जण बचावला…

125

अरुंद रस्ता आणि अतिक्रमण ठरतोय अपघाताचे कारण

तालुका प्रतिनिधी सचिन ढेंगरे

आरमोरी: आरमोरी शहरात आज झालेल्या ट्रक आणि दुचाकी या वाहनांची जोरदार धडक होऊन अपघात झाला असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.
जखमीला उपचारा करीता दवाखान्यात नेल्या नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीने तीन युवक जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला त्या तरुणाला तात्काळ आरमोरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान गंभीर जखमी असलेल्या युवकाचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या तरुणाला कुठलीही दुखापत झाले नसल्याची माहिती समोर येत आहे.सदर दुचाकी वाहनावरील तिन्ही तरुण वेगवेगळ्या गावचे रहिवासी आहेत. सदर अपघात आरमोरी येथील भूमी इन्स्पायर कार्यालयासमोर झाला.

अपघात घडल्यानंतर ट्रक ड्रायवर घटनास्थळावरून फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. आरमोरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन प्रकरणाचा पुढील तपास सुरू केले आहे. दुचाकी आणि ट्रॅक यांच्यामध्ये झालेला अपघात हा रस्त्याचे रुंदीकरण व अतिक्रमण मुळे झाला असे नागरिकांन कडून बोलले जात आहे.

प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर आरमोरी शहरातील अतिक्रमण काढून रस्ता रुंदीकरणाचे काम करावे अशी मागणी जनते कडून केली जात आहे.

Don`t copy text!