Home Breaking News अन् तीच्या मृत्युने संपूर्ण गाव हळहळला…

अन् तीच्या मृत्युने संपूर्ण गाव हळहळला…

76

महिला प्रतिनिधी रूपाली रामटेके मुलचेरा

विद्युत तारामधून कुंपणाच्या तारा मध्ये विद्युत प्रवाहित झाल्याने 14 वर्षीय मुलीचा मृत्यू

मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा येथे 14 वर्षीय शाळकरी मुलीचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना दिनांक 25 ऑक्टोंबर शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली वैष्णवी लक्ष्मण हजारे वय 14 वर्ष रा. मल्लेरा तालुका मुलचेरा जिल्हा गडचिरोली असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे.

शनिवारी सकाळच्या सुमारास वैष्णवी शौचालयासाठी घरालगतच्या शेतात गेली असता. शेताला ताराचे कुंपण लावले होते. त्या लगतच विद्युत खांब असल्याने त्या खांबावरील तारांचा विद्युत प्रवाह कुंपणाच्या तारात प्रवाहित झाला कुंपनाच्या तारांचा स्पर्श वैष्णवी ला झाल्याने तीचा विद्युत झटक्याने जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच मुलचेरा पोलिस व महावितरणचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.वैष्णवीची अतिशय हुशार विद्यार्थिनी अशी ओळख होती. ती अतिशय शिस्तप्रिय व मनमिळावू स्वभावाची होती. ती सध्या शिवाजी विद्यालय कोपरल्ली येथे आठव्या वर्गात शिकत होती. तिच्या मृत्यूची वार्ता समजताच गावकऱ्यासह सारेच हळहळले. तीच्या पाठीमागे आई वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. तीच्या अशा दुदैवी मृत्युने हजारे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून तिच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. शुक्रवारी मल्लेरा भागात मुसळधार पाऊस झाल्याने मुख्य. लाईन च्या तारामधून कुंपणाच्या तारात विद्युत प्रवाह प्रवाहित झाल्याचे बोलल्या जात असुन महवितरण ने मृतक वैष्णवी च्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी मल्लेरावासियांनी केली आहे. घटनेचा पुढील तपास मुलचेरा पोलिस करीत आहे

Don`t copy text!