Home Breaking News अरण्यवास बुद्ध विहार,कोठरी येथे वर्षावास समापन सोहळा संपन्न!..

अरण्यवास बुद्ध विहार,कोठरी येथे वर्षावास समापन सोहळा संपन्न!..

194

जिल्हा संपादक नितेश खडसे

!बुद्ध विहार नालासंगम कोठरी येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांची सदिच्छा भेट !.

!राष्ट्रीय मानवाधिकार संघटना व धाकडे दातांचा दवाखाना यांच्या वतीने उपस्थित उपासक उपासिका यांना खीरचे वाटप!

दिनांक 24 ऑक्टोंबर 2025 गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील चामोर्शी तालुक्यातील बुद्ध विहार नालासंगम कोठरी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वर्षावास समापन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते यानिमित्ताने या ठिकाणी भव्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने देशभरातील विविध राज्यातील मान्यवर यांचे आगमन या ठिकाणी झाले होते या ठिकाणी बौद्ध विहार कोठरीच्या वतीने येथील भन्ते भगीरथ यांच्या हस्ते विविध कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आले !.


येथे आलेल्या समस्त उपासक,उपासिका नागरिक मान्यवर यांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली व डॉ. धाकडे दातांचा दवाखाना यांच्या वतीने गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांचे शुभ हस्ते खीरचे वाटप करण्यात आले. व शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रणय खुणे. माजी आमदार डॉ.नामदेव उसेन्डी. भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश भाऊ गेडाम. सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ भडके.प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. धर्मेंद्र धाकडे. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महिला आघाडी अध्यक्ष मनीषाताई मडावी. राष्ट्रीय मानवाधिकार संघटन जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी.आयु प्रवीण भाऊ मुंजुमकर. विनोद किरमे. शुभंकर चक्रवर्ती. व पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!