Home Breaking News नागपूरमध्ये १८२ वे अवयवदान — चंद्रमणी जामगडे यांच्या परिवाराचा प्रेरणादायी निर्णय…

नागपूरमध्ये १८२ वे अवयवदान — चंद्रमणी जामगडे यांच्या परिवाराचा प्रेरणादायी निर्णय…

222

कार्यकारी संपादक दिनेश मंडपे 

नागपूर :
नागपूर विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती (ZTCC-नागपूर) च्या माध्यमातून आजपर्यंत एकूण १८२ मेंदूमृत अवयवदान पूर्ण झाले असून, वर्ष २०२५ मधील हा १३ वा मेंदूमृत अवयवदानाचा प्रसंग नोंदविण्यात आला आहे.

या प्रसंगी अवयवदाता श्री. चंद्रमणी जामगडे (वय ६६ वर्षे), राहणार बिडगाव (नगरपंचायत), ता. कामठी, जि. नागपूर यांच्या कुटुंबीयांनी मोलाचा निर्णय घेत अवयवदानास संमती दिली.
त्यांच्या दोन मुलांनी – विरू जामगडे (३७) आणि पंकज जामगडे (३५) यांनी त्यांच्या वडिलांचे लिव्हर, दोन किडनी आणि बुबुळे (कॉर्निया) दान करण्यास लेखी संमती दिली.

अवयव वाटप (राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार) :

लिव्हर – ६५ वर्षीय महिला, न्यू इरा हॉस्पिटल, नागपूर

किडनी १ – ५७ वर्षीय पुरुष, न्यू इरा हॉस्पिटल, नागपूर

किडनी २ – ५३ वर्षीय महिला, एम्स, नागपूर

बुबुळे – महात्मे आय बँक, नागपूर

घटनेचा आढावा :

श्री. चंद्रमणी जामगडे हे म.न.पा. नागपूर येथे माजी सफाई कर्मचारी होते. त्यांच्या परिवारात पत्नी नंदा (५८) आणि दोन मुलगे विरू (३७) व पंकज (३५) आहेत.
दिनांक २१ ऑक्टोबर रोजी त्यांना घरातच अचानक भोवळ आली. तत्काळ त्यांना न्यू इरा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांच्या मेंदूमध्ये तीव्र रक्तस्राव झाल्याचे निदान झाले. सर्व वैद्यकीय प्रयत्न करूनही त्यांची स्थिती न्युरोलॉजिकल दृष्ट्या खालावली आणि डॉक्टरांच्या टीमने त्यांना मेंदूमृत घोषित केले.

या वेळी न्यू इरा हॉस्पिटल येथील समन्वयक डॉ. अश्विनी चौधरी यांनी कुटुंबीयांना अवयवदानाविषयी सविस्तर माहिती देत समुपदेशन केले. मुलगे विरू व पंकज यांनी कुटुंबीयांशी चर्चा करून अवयवदानास संमती दिली.

*ZTCC नागपूरचे ट्रान्सप्लांट समन्वयक दिनेश मंडपे यांनी प्रतीक्षा यादीनुसार अवयव वाटपाची पुढील प्रक्रिया पूर्ण केली.*

 

मेंदूमृत समिती (Brain Death Committee) :

डॉ. निलेश अग्रवाल, डॉ. पराग मून, डॉ. साहिल बन्सल व डॉ. विवेक देशपांडे यांनी वैद्यकीय निकषांनुसार मेंदूमृत घोषित केले.

ग्रीन कॉरिडॉर :

DCP ट्रॅफिक पोलीस श्री. लोहित मताणी यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू इरा हॉस्पिटल ते एम्स नागपूर दरम्यान एका किडनीच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्यात आला.
या दरम्यान न्यू इरा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी दात्यास अभिवादन करत ऑनर कॉरिडॉर तयार केला आणि कुटुंबास त्यांच्या मूळ गावी बिडगाव (ता. कामठी) येथे जाण्यासाठी फ्री अँब्युलन्स सेवा उपलब्ध करून दिली.

ZTCC नागपूर पदाधिकारी :

अध्यक्ष : डॉ. संजय कोलते
सचिव : डॉ. राहुल सक्सेना
ट्रान्सप्लांट समन्वयक : दिनेश मंडपे

📍 ZTCC नागपूर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर
📞 हेल्पलाइन : ९१७५९९९७३५

Don`t copy text!