Home Breaking News चंद्रपूर पोलिसांनी ०२ देशी कट्टे व ०२ माउझर गन अग्नीशस्त्र साठा केले...

चंद्रपूर पोलिसांनी ०२ देशी कट्टे व ०२ माउझर गन अग्नीशस्त्र साठा केले जप्त…

206

प्रतिनिधी गौरव मोहबे

पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथील डि.बी. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पो. स्टे. परीसरामध्ये पेट्रोलींग करीत असता त्यांना मुखबीरव्दारे खबर मिळाली की, पो स्टे चंद्रपुर शहर चे रेकार्डवरील आरोपी छोटु सुर्यवंशी रा बल्लारपुर हा आपल्या काही साथीदारासह काळया रंगाच्या डस्टर कारने दादामिया ट्रान्सपोर्ट गॅरेज समोरील मोकळी जागा, गंजवार्ड, चंद्रपुर येथे देशी कट्टा घेवून येणार आहे. अशी माहिती मिळाल्याने सदर माहितीची शाहानिशा करून कार्यवाही करणे असल्याने सदर ठिकाणी दोन पंचासह रवाना झाले असता सदर ठिकाणी काही इसम एका काळया रंगाच्या डस्टर गाडीच्या बाजुला उभे दिसले व दोन इसम हे गाडीमध्ये बसुन दिसल्याने सोबतचे पोलीस स्टॉपसह घेराव घालुन नमुद इसमांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता तिथे असलेल्या इसमांपैकी ०४ इसम पळुन गेले व ०४ इसमांना पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले. तसेच त्यांचे ताब्यातील काळया रंगाच्या डस्टर कारची झडती घेतली असता ड्रायव्हर सिटचे पायाजवळ एका पिशवीमध्ये ०२ देशी कट्टे व ०२ माउझर गन अग्नीशस्त्र, एकुण ३५ जिवंत काडतुस तसेच ०४ लोखंडी खंजर मॅनसह व इतर साहित्य असा एकुण १७,४५,०००/- रू चा माल मिळुन आल्याने नमुद आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अपराध क. ७५८/२०२५ कलम ३१० (४) भा.न्या.सं. सहकलम ३, ४, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. निशीकांत रामटेके, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. चंद्रपुर शहर हे करत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सुदर्शन मुमक्का सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक, श्री ईश्वर कातकडे, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी, श्री. प्रमोद चौघुले सा., मा. पोलीस निरीक्षक, श्री. निक्षीकांत रामटेके, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांचे मार्गदर्शनात पो.स्टे. डि.बी. पथकाचे सपोनी राजेंद्र सोनवने, पोउपनि दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे प्रोहवा लक्ष्मण रामटेक, संजय धोटे, इम्रान शेख सचिन बोरकर, निकेश ढेंगे, जावेद सिध्दीकी, भावना रामटेके, कपुरचंद खरवार, रूपेश पराते, निलेश ढोक, योगेश पिदुरकर, विक्रम मेश्राम, प्रफुल भैसारे, मपोअ दिपीका झिंगरे, सारीका गौरकार यांनी केली आहे.

Don`t copy text!