प्रतिनिधी गौरव मोहबे
चंद्रपूर :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्याचे आयोजन जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केले असून प्रदेश सचिव श्री आबिद अली साहेब, शहर जिल्हाध्यक्ष श्री राजीव भैय्या कक्कड, महिला जिल्हाध्यक्षा सौ रंजना ताई पारशिवे, माजी नगराध्यक्ष श्री दिपक भैय्या जैस्वाल, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष श्री सुनील भाऊ काळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे जिलाध्यक्ष श्री राकेश भैय्या सोमानी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष श्री सुजित उपरे, कार्याध्यक्ष श्री सागर भाऊ तामगाडगे, कामगार नेते श्री वामन बुटले साहेब, कामगार जिल्हाध्यक्ष श्री संजय भाऊ शेजुळ,
वैद्यकीय जीलाध्यक्ष श्री पंकज ढेंगारे, सोशल मीडिया जिलाध्यक्ष श्री अमर गोमासे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री मुन्ना आवळे, ज्येष्ठ नेते श्री देविदास रामटेके साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री डी के आरेकर साहेब, श्री जगदीश जुनघरी साहेब, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री अविनाश जी राऊत, सामाजिक कार्यकर्ते मा. गिरीधर लांबट साहेब, कामगार नेते शंकर बागेसार साहेब, श्री गजानन जवादे साहेब श्री रवी भडके साहेब, सामाजिक कार्यकर्ते श्री खजांची मोरे साहेब, दुर्गापुरचे माजी सरपंच श्री अमोल ठाकरे, उपसरपंच श्री आसिफ भाई पठाण यांच्या सह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाप्रसंगी बोलताना संपर्कमंत्री मा. इंद्रनील नाईक साहेब यांनी यापुढे सतत चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येणार असुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून आलेल्या सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी देखील खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही दिली. तसेच उद्योग राज्यमंत्री म्हणून जिल्ह्यात असलेल्या विविध उद्योग व प्रकल्पांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिकांना प्राधान्य देत रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच एक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून युवकांना न्याय देण्याची भूमिका घेणार असल्याचे जाहीर केली.
पक्षप्रवेश ..!!
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आयोजित मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष श्री सुधाकर काकडे साहेब तसेच कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री प्रदीप ढाले साहेब, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुधाकर घोरपडे साहेब, पदमापूर येथील ग्रामपंचायत सरपंचा सौ आम्रपाली ताई अलोणे, मोहर्ली ग्रामपंचायत चे उपसरपंच श्री विकासभाऊ मेश्राम, अडेगाव चे माजी उपसरपंच श्री राजूभाऊ भुरकुंडे, पायली गावच्या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष श्री मिथुन भाऊ रायपुरे, लखमापूर ग्रामपंचायत सदस्य श्री लवलेश भाई निषाद, सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल फाले साहेब, उर्जानगर ग्रामपंचायत चे माजी सदस्य श्री किशोर भाऊ आवळे तसेच सौ सुनंदा ताई अनिल फाले, भटाळी ग्रामपंचायत सदस्य श्री. किशोर भाऊ रत्नपारखी,
पदमापूर ग्रामपंचायत च्या माजी सदस्या सौ विनाताई म्हरसकोल्हे, सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक लेनगुरे साहेब, श्री कलीम भाई शेख, श्री हुसेन भाई पठाण, श्री महेबूब भाई शेख, श्री नजीर भाई सय्यद, श्री अय्युब भाई शेख, रावण ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष श्री शैलेश भाऊ बोरकर यांच्यासह त्यांचे संपूर्ण सहकारी, सामाजिक कार्यकर्ते श्री विष्णू भाऊ मिटकरी, श्री आझाद भाई खान, श्री सागर भाऊ मुस्समवार, श्री. वसीम भाई कुरेशी, श्री चेतन भाऊ पुणेकर, श्री वानखेडे काका, सौ अनिता ताई जुमनाके, सौ. रेखाताई जवाडे यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी तथा सामाजिक क्षेत्रात काम करणारे सन्माननीय कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.