खासदार प्रतिभा ताई धानोरकर यांच्या आंदोलनाला यश…

149

सहसंपादक श्याम मशाखेत्री

अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी नागपूर-चंद्रपूर महामार्गावर केलेल्या ‘चक्काजाम’ आंदोलनाला यश आले आहे. शेतकऱ्यांच्या तीव्र मागणीची आणि संतापाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने तातडीने पाऊले उचलली असून, चंद्रपूर जिल्ह्यातील १४ तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित केले आहेत. या बाधित भागांसाठी शासनाने विशेष मदत पॅकेज आणि विविध सवलती लागू करण्यास मान्यता दिली आहे.

९ ऑक्टोबर २०२५ रोजी, महसूल व वन विभागाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला. या निर्णयानुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, बल्लारपूर, चंद्रपूर, सावली, भद्रावती, वरोरा, चिमूर, राजुरा, कोरपना, नागभीड, जिवती, गोंडपिंपरी, पोभुरना, आणि ब्रम्हपुरी या सर्व १४ तालुक्यांचा समावेश बाधित तालुक्यांच्या यादीत करण्यात आला आहे.

या विशेष पॅकेज अंतर्गत शेती पिकांच्या नुकसानीसाठी भरीव मदत जाहीर करण्यात आली आहे. यात जिरायत पिकांसाठी प्रति हेक्टर ८,५०० रुपये आश्वासित सिंचनाखालील (बागायत) पिकांसाठी १७,००० रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी २२,५०० रुपये (सर्व मदत ३ हेक्टरच्या मर्यादेत) दिली जाणार आहे. याशिवाय